Belgaum Crime News esakal
कोल्हापूर

Belgaum : अनैतिक संबंध समजल्यामुळं पत्नीकडून पतीचा खून; प्रियकराच्या मदतीनं काढला काटा, मृतदेह फेकून दिला घाटात

मृतदेह एका घाटात नेऊन फेकून दिल्याचे समजले असल्याने मृतदेहाचा शोधही चालविला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एपीएमसी पोलिस ठण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी एक जण अचानक बेपत्ता झाला.

बेळगाव : अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना एपीएमसी पोलिसांनी (APMC Police) उघडकीस आणली आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.

मात्र, अद्याप मृतदेह किंवा अवषेश हाती लागू शकले नाहीत. खून केल्यानंतर मृतदेह एका घाटात फेकून दिल्याचे पोलिसांना समजले असल्याने मृतदेहाचा शोध सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिस तपास सुरु असल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले.

एपीएमसी पोलिस ठण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी एक जण अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे त्याच्या पत्नीने ५ मे २०२३ रोजी एपीएमसी पोलिस ठाण्यात कर्जबाजारीपणामुळे आपला पती घरातून निघून गेला आहे. तो अद्याप परतलाच नाही, अशी फिर्याद एपीएमसी पोलिसांत दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता असा गुन्हा दाखल करुन तपास चालविला. याप्रकरणी संशय बळावल्याने पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी उलट तपास सुरु केला. पत्नीला पोलिस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केली असता आपले अनैतिक संबंध उघडकीस आल्याने प्रियकर व त्याच्या अन्य दोघा सहकाऱ्यांच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे कळते.

त्यानुसार पोलिसांनी संबंधितावर रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करुन घेण्याचे काम सुरु होते. मृतदेह एका घाटात नेऊन फेकून दिल्याचे समजले असल्याने मृतदेहाचा शोधही चालविला आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याने आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल, असे मार्केटचे एसीपी नारायण बरमणी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT