Appasaheb Nalawade Gadhinglaj Cooperative Sugar Factory esakal
कोल्हापूर

Sugar Factory : मुश्रीफांची सत्ता असलेला 'गोडसाखर' पुन्हा भाडेतत्त्‍वाच्या वाटेवर; काय होणार निर्णय? ऊस उत्पादकांचे लागले लक्ष

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) पुन्हा एकदा चालवायला देण्याचे संकेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर झाले आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता मिळविली. डॉ. प्रकाश शहापूरकर अध्यक्ष झाले.

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) पुन्हा एकदा चालवायला देण्याचे संकेत आहेत. शनिवारी (ता. १८) बोलविलेल्या संचालक मंडळ बैठकीच्या नोटिसीत या विषयावर चर्चा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ७५ कोटींचे आर्थिक पाठबळ देऊनही अचानक कारखाना चालवायला देण्याचा विषय पुढे आल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.

कारखाना (Appasaheb Nalawade Gadhinglaj Sugar Factory) आर्थिक अडचणीत आल्याने २०१३ पासून ब्रिस्क कंपनीकडे (Brisk Company) भाडेतत्त्‍वाने चालविण्यासाठी दिला. दहा वर्षांची मुदत असताना आठ हंगाम पूर्ण करून कंपनीने कारखाना सोडला. त्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने २०२१-२२ चा हंगाम सुरू करण्यास अर्थसाहाय्‍य उपलब्धतेसाठी सुरू केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.

अखेर तत्कालीन अध्यक्ष कै. श्रीपतराव शिंदे व त्यांच्या समर्थक संचालकांनी तालुक्यातून विविध संस्था व वैयक्तिक ठेव गोळा करून कारखाना स्वबळावर सुरूही केला. दरम्यान, अंतर्गत वादामुळे १२ संचालकांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले. यामुळे कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली. दरम्यान, प्रशासकांनी कारखाना चालविण्यास देण्याची दोनवेळा निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्यासाठी कोणतीच कंपनी पुढे आली नाही. त्यानंतर झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर झाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता मिळविली. डॉ. प्रकाश शहापूरकर अध्यक्ष झाले. मुश्रीफ यांनी केडीसीसीच्या माध्यमातून कारखान्याला पहिल्या टप्प्यात ५५ कोटींचे अर्थसहाय्‍य दिले. मशिनरी दुरुस्तीसाठी मोठा अवधी लागल्याने कारखान्याचा २०२३-२४ चा हंगाम उशिरा का होईना स्वबळावर सुरू झाला. यामुळे निवडणुकीत स्वबळावर कारखाना चालविण्याचे सभासदांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादकांसह तोडणी-ओढणीची बिले देण्यासाठीही केडीसीने २० कोटींचे अर्थसहाय्य दिले.

त्यानंतर अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी एका ट्रस्टकडून ३०० कोटींचे अर्थसहाय्य घेण्याचा विषय संचालकांच्या बैठकीत आणला. त्याला एकमताने मंजुरीही मिळाली. दरम्यान, स्वबळासाठी केडीसीसीने मोठे अर्थसहाय्याचे पाठबळ देऊनही आता पुन्हा कारखाना चालवायला देण्याच्या विषयावर सभासद व उत्पादकांत जोरात चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीसमोर दोनच विषय

शनिवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता कारखाना सभागृहात होणाऱ्या संचालक मंडळाच्‍या बैठकीसमोर दोन विषयांची नोटीस सचिवांच्या सहीने काढली आहे. कारखाना चालवण्यास देणे व अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या ऐनवेळच्या विषयावर चर्चा करणे असे दोनच विषय आहेत. यातील कारखाना चालवण्यास देण्याचाच मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. त्यावर कोणता निर्णय होणार, याकडे आता तालुक्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT