solapur 
पश्चिम महाराष्ट्र

वाहनांची मॅन्युअली तपासणी होणार बंद 

तात्या लांडगे

सोलापूर : वाहन निरीक्षकांद्वारे मॅन्युअली पध्दतीने होणारी वाहनांची तपासणी आता कालबाह्य होणार असून वाढते अपघात कमी करण्यासाठी आता वाहनांची शास्त्रोक्‍त तपासणी केली जाणार आहे. सोलापूरसह नगर, पनवेल, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये ऍटोमेटेड इन्स्पेक्‍शन सेंटर उभारले जाणार आहेत. त्यासाठी पुण्यातील ऍटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेची केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने नियुक्‍ती केली आहे. 


देशातील रस्ते अपघातांमध्ये महाराष्ट्र टॉप टेनमध्ये आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 35 हजारांहून अधिक रस्ते अपघातांमध्ये सुमारे 16 हजार जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. दुचाकी, स्कूल बस, एसटी बस, ट्रक, कार अशा वाहनांच्या अपघातांचे प्रमाण मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे वाहनांच्या तांत्रिकदृष्ट्या तपासणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले. दुसरीकडे काही अधिकारी पैसे घेऊन वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देत असल्याचे आरोपही झाले. या पार्श्‍वभूमीवर आता वाहनांची शास्त्रोक्‍त पडताळणी करण्याच्या उद्देशाने राज्यभरात ऍटोमेटेड इन्स्पेक्‍शन सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने घेतला. त्यासाठी पुण्यातील 'एआरएआय' या संस्थेची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे प्रत्येक जिल्ह्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्याला प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

ठळक बाबी... 
- वाढत्या अपघातांवरील नियंत्रणासाठी राज्यभरात होणार ऍटोमेटेड इन्स्पेक्‍शन सेंटर 
- ऍटोमेटेड इन्स्पेक्‍शन सेंटर उभारणीसाठी प्रत्येकी किमान 22 ते 25 कोटींचा खर्च अपेक्षित 
- पुण्यातील 'एआरएआय' या संस्थेकडे राज्यातील सेंटर उभारणीची जबाबदारी 
- स्कूल बस तपासणीसाठी लागणारा 30 मिनिटांचा वेळ आता 15 मिनिटांनी होणार कमी 
- जिल्हास्तरावरील प्रास्तावित केंद्रांचा अहवाल 'एआरएआय'च्या मार्फत परिवहन आयुक्‍तांना जाणार 

राज्यातील सर्व नव्या वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पुण्यातील 'एआरएआय' या संस्थेकडे सोपविली आहे. सोलापुरात ऍटोमेटेड इन्स्पेक्‍शन सेंटर होणार असल्याने प्रत्येक वाहन निरीक्षकांवरील 22 वाहनांच्या तपासणीचे बंधन राहणार नाही. या सेंटरमुळे वाहनांची तपासणी कमी वेळेत आणि शास्त्रोक्‍त होईल. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT