Crime News Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Crime : शाळेत घेऊन जातो असं सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्राला 30 वर्षांची शिक्षा

मिरज शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेला गर्भवती असल्याचा अहवाल व तिच्या तक्रारीमध्ये पोलिसांना तफावत आढळून आली.

सकाळ डिजिटल टीम

पोलिस चौकशीत पीडितेने तिच्या मित्राविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे निष्पन्न झाले.

मिरज : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मारुती शंकर झोरे (५०, मिरज) यास न्यायालयाने दोषी ठरवून तीस वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात ऑगस्ट २०२० मध्ये पीडितेला अकरावीच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये घेऊन जात आहे, असे सांगून आरोपी झोरे याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी मिरजेतील एका पॅथॉलॉजी सेंटर येथे नेले. तपासणीनंतर पीडिता गर्भवती असल्याचे लक्षात आले.

अधिकाऱ्यांनी आरोपी झोरे याच्याकडे पीडितेच्या वयाबाबत चौकशी केली असता त्याने तिचे वय १८ हून अधिक असल्याचे सांगितले. मात्र तिच्या वयाबाबत शंका आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत कल्पना दिली. पोलिस चौकशीत पीडितेने तिच्या मित्राविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे निष्पन्न झाले.

मिरज शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेला गर्भवती असल्याचा अहवाल व तिच्या तक्रारीमध्ये पोलिसांना तफावत आढळून आली. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी तिच्याकडे चौकशी केली असता पीडितीने आरोपी मारूती झोरे यानेच अत्याचार केल्याचे.

तसेच त्यानेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीचे नाव सांगण्यास सांगितले. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पीडितेने ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. तिच्या जबाबावरून अखेर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात (Miraj Police) आरोपी मारुती झोरेविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT