b
पश्चिम महाराष्ट्र

पॅंट उतरविणारा नगरसेवक पडला पाया 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : येथील पालिकेतील नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात टेबलवर चढून चक्‍क स्वत:ची पॅंट उतरवून वादग्रस्त आंदोलन केले होते. त्यावरून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. शनिवारी पालिकेच्या सभेत एका विषयासाठी चक्‍क खंदारे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या पायाच पडले. 

मल्हारपेठ येथील शौचालयांच्या स्वच्छता तसेच मी सांगितलेले विषय सभेच्या विषयपत्रिकेत का घेतले नाहीत, या मुद्यावरून आक्रमक होवू खंदारे यांनी थेट उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन गाठले होते. त्यावेळी शौचालयातील बादली घेवून ते दालनात गेले. आक्रमक होत टेबलवर चढले. तद्‌नंतर चक्‍क स्वत:ची पॅंट गुडग्यापर्यंत उतरविली. सभेसाठी खंदारेंनी सुचविलेले विषय घेतले असल्याचे कागदोपत्री दाखविल्यानंतर ते शांत झाले होते. मात्र, त्यानंतर श्री. धुमाळ यांनी त्यांच्यावर असभ्य वर्तन करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

अध्यक्ष "आई', खंदारे "मुलगा' 

मल्हारपेठमध्ये कुमार तपासे घर ते बसाप्पा पूल येथपर्यंत गटर करण्यासाठी बजेटमध्ये 30 लाख 53 हजारांची तरतूद केली होती. मात्र, ऐनवेळी ते काम मागासवर्गीय निधीतून करण्याचा ठराव मांडण्यात आल्याने बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांनी जोरदार आक्षेप घेतला. हे काम अर्थसंकल्पातील निधीतूनच करावे, असे खंदारेंनी ठाम आग्रह धरला. यावेळी ते म्हणाले, ""अध्यक्ष तुम्ही माझ्या आईसारखे आहात. अन्याय करू नका.'' त्यावर अध्यक्षांनी "आईचे मुलाने ऐकाचे असते,' अशी कोपरखळी मारली. त्यामुळे सभागृहात हशा पिकला. 

भावनिक होवून विषय मांडू नका 

तद्‌नंतर कॅनॉल टाइप गटरचे काम पालिकेच्या बजेटमधूनच करावे, यासाठी खंदारेंनी धरलेल्या आग्रहावर खुलासा करण्यास मुख्याधिकारी शंकर गोरे आले. त्यावेळी "मी तुमच्या पाया पडतो, काम बजेटमधूनच करा,' असे भावनिक आवाहन करत चक्‍क खंदारे सीओंच्या पायाच पडले. मात्र, अशोक मोनेंनी खंदारेंना खडसावले. ते म्हणाले, ""ऐकून घ्यायची सवय लावा. पाया पडतो, आभार मानतो, हे येथे नको. भावनिक होवून विषय मांडू नका.'' यानंतर सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. 

सीओ, तुम्हाला भोगावे लागेल 

गेली तीन वर्षांत वारसा हक्‍काने भरावयाच्या रिक्‍त जागांवर भरती केली नाही. त्यांना कोणी वाली नाही, असे वाटू देवू नका. कामगारांचा विषय हसण्यावारी, चेष्टेने घेवू नका. हा विषय मार्गी लावण्यासाठी आणखी एकदा तुमच्या पाया पडतो. ही कामे झाली नाही तर त्यांचे शाप तुम्हाला लागतील. तुम्हाला ते भोगावे लागेल, असा भावनिक इशारा खंदारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT