संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
पश्चिम महाराष्ट्र

गळ्याला चाकू लावून ३४ हजारांचा ऐवज लंपास 

हरिभाऊ दिघे

तळेगाव दिघे (संगमनेर) : तालुक्यातील नान्नजदुमाला येथे रात्रीच्या सुमारास देशमुख यांच्या घरात घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी ३४ हजारांचा माल लंपास केला. बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  

नान्नजदुमाला येथे केशव शंकर देशमुख यांचे कुटूंब राहते. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोघे अज्ञात चोरटे घरात घुसले व ३४ हजारांच्या रकमेसह सोन्याचे डोरले चोरले. घरात झोपलेल्या केशव देशमुख यांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत ३४ हजार रुपये व देशमुख यांच्या पत्नीचे सोन्याचे डोरले जबरदस्तीने हिसकावून घेत दोघेही चोरटे पसार झाले. 

याबाबत केशव शंकर देशमुख (वय ५२) यांनी पोलिसांत फिर्याद दिली असता संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रजि. १६४ / २०१७ भारतीय दंडविधान कलम ३९२ अन्वये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पाळंदे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT