election
election esakal
पश्चिम महाराष्ट्र

आघाड्या-युतींचा खेळ आता सुरू; 5 नगरपालिकांसाठी धुमशान

सकाळ वृत्तसेवा

विद्यमान सदस्यांची मुदत संपत आली तरी अजून प्रभाग निश्चित झाले नाहीत.

तासगाव : जिल्ह्यातील पाच नगरपालिका निवडणुकींची तयारी सुरु झाली असून नव्या वाढीव सदस्य संख्येच्या द्विसदस्यीय प्रभाग रचनेचे आराखडे शनिवारी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहेत. डिसेंबरअखेर प्रभागरचना, नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षणे निश्चित होण्याची शक्यता आहे. आता नगराध्यक्ष निवड नगरसेवकामधून होणार असल्याने यावेळच्या निवडणुका अधिक रंगतदार होणार आहेत. आघाड्या-युतींचा खेळ आता सुरू होणार आहे.

तासगाव, विटा, आष्टा, इस्लामपूर आणि पलूस या पालिकांतील कारभाऱ्यांची मुदत २ जानेवारी रोजी संपणार आहे. नवी प्रभाग रचना, आरक्षणे ही प्रकिया फेब्रुवारी २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे गेला. नंतर थेट नगराध्यक्ष निवड पद्धती बदलण्यात आली. त्यानंतर वाढीव लोकसंख्येचे कारण देत सदस्य संख्या वाढविण्यात आली. द्विसदस्य प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान सदस्यांची मुदत संपत आली तरी अजून प्रभाग निश्चित झाले नाहीत.

निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचे आराखडे शनिवारी सादर केले आहेत. आठवडाभरात त्यातील त्रुटी दूर करून हे आराखडे जिल्हाधिकाऱ्यांकडे येतील. त्यानंतर पक्के आराखडे जाहीर होऊन सदस्यांची आरक्षणे जाहीर होतील. दरम्यान, नगराध्यक्ष आरक्षणेही जाहीर होतील हे सारे डिसेंबर अखेर होणे अपेक्षित आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या तयार होणे. या प्रकियेच्या प्रत्येक पायरीवर हरकती मागविणे त्याचे निरसन होणे आणि त्यांनतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम अशी वेळखाऊ प्रकिया आहे.

दरम्यान, विद्यमान सदस्यांची मुदत नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपत असल्याने पालिकेची निवडणूक पुढे गेल्यात जमा आहे. निवडणूक किती पूढे जाणार? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा सुरू आहे. त्या निवडणुकापूर्वी पालिका निवडणुका होणार का? एकत्रित होणार ? याबाबत अटकळी बांधल्या जाऊ लागल्या आहेत.

"तासगाव नगरपालिकेत नवी नगरसेवक संख्या तीनने वाढून २४ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार द्विसदस्य पद्धतीचा २३०० मतदारांचा आणि ३ हजार ते ३३०० लोकसंख्येचा १ याप्रमाणे १२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाला प्रभाग रचना सादर झाली. त्यामध्ये २ अनुसूचित जातीसाठी ६ ओबीसी तर उर्वरित खुले अशी सदस्य संख्या असणार आहे."

- पृथ्वीराज पाटील, मुख्याधिकारी, तासगाव

प्रशासक नेमण्याची शक्यता

नगरपालिकांची मुदत २ जानेवारी रोजी संपत आहे. एकूणच निवडणुकीची सुरू असलेली तयारी पाहता पालिकांच्या निवडणुका पुढे जाणार हे जवळपास निश्चित आहे. दोन जानेवरीनंतर निवडणूक होईपर्यंत विद्यमान सदस्यांना मुदतवाढ न मिळता महापालिकांच्या धर्तीवर पालिकावरही प्रशासक नेमण्याची शक्यता आहे.

अशी लढत होण्याची शक्यता..

इस्लामपूर पालिका -

इस्लामपुरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शहर विकास आघाडी अशीच लढत होणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात ही सर्वपक्षीय आघाडी होईल. त्यामध्ये आमदार सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, राहुल व सम्राट महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार यांच्या शिवसेना, भाजप, रयत क्रांती संघटना, काँग्रेस यांची आघाडी असेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

तासगाव पालिका -

तासगाव पालिकेत भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढतीची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात आहे. राज्यात असलेल्या महाआघाडीप्रमाणे शहरातही शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आणण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.

आष्टा पालिका -

गत निवडणुकीतील निकालावरून यंदा सत्ताधारी विरोधात सर्वपक्षीय विरोध एकटवले आहे. अपक्षांचे मोठे आवाहन सत्ताधाऱ्यासमोर असले. मंत्री जयंत पाटील आणि दिवंगत नेते विलासराव शिंदे यांच्या गटाच्या मनोमिलनामुळे सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे.

विटा पालिका -

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे संयुक्त महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष असला तरी स्थानिक पालिका निवडणुकीत मात्र शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटात व कॉग्रेसमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटात प्रामुख्याने लढत होणार आहे. येथे भाजपची ताकद तोकडी असल्याने ते कोणत्या गटाला पाठिंबा देणार का निवडणूक रिंगणात उतरणार हे आगामी येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

पलूस पालिका

गेल्या निवडणूकीत चौरंगी लढतीत काँग्रेसने बाजी मारत नगरपालिकेवर झेंडा फडकवला. यंदाही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि स्वाभिमानी या पक्षांना स्वतंत्र लढण्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, अंतीम क्षणी काँग्रेस विरोद्ध सर्व पक्षीय अशी मोट बांधली जावू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT