पश्चिम महाराष्ट्र

वृक्षारोपणापुर्वीच "येथील' नगरसेवकांना "फळा'ची अपेक्षा 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः वृक्षारोपणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करू लागले आहे. सोलापूर महापालिकेत मात्र या योजनेतही काही वाटा मिळतो का याचा प्रयत्न काही नगरसेवकांनी सुरु केला आहे. वृक्षारोपणापूर्वीच "फळा'ची अपेक्षा होऊ लागल्याने योजना राबविण्याचे नियोजन कोलमडले असून वृक्षारोपण प्रत्यक्षात कधी होते याबाबत अद्याप काहीच निश्‍चित झालेले नाही. 

अधिकाऱ्यांनीच "फळा'ची व्यवस्था करावी 
या योजनेंतर्गत विविध प्रभागांमध्ये वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. काही प्रभागातील नगरसेवकांनी वृक्षारोपणापूर्वीच "फळा'ची अपेक्षा केल्याने योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे "फळ' अधिकाऱ्यांमार्फत आमच्यापर्यंत पोचावे अशी त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळे या प्रकरणी गंभीरता वाढली आहे. आता महापालिकेतील पदाधिकारी या प्रकरणात किती गांभीर्याने लक्ष घालतात, त्यावर या योजनेचे फलित असणार आहे. 

82 टक्के झाडे जिवंत असल्याचा दावा 
शासनाने 2018-19 मध्ये आठ हजार झाडांचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी आजच्या घडीला 82 टक्के झाडे ही जिवंत आहेत, असा प्रशासनाचा दावा आहे. तर हे वृक्षारोपण झालेच नाही असे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कालावधीत एमआयडीसी, प्राणीसंग्रहालय, मुख्य प्रवेशद्वार, मोदी स्मशानभूमी, मुख्य रस्ता, धर्मवीर संभाजी तलाव परिसर, जानकीनगर, जुळे सोलापूर परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. 

दुसऱ्यांदा काढली निविदा 
यंदाच्या वर्षासाठी 2 लाख 20 हजार रोपांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 67 हजार रोपे खरेदी करण्यात आली. अमृत योजनेतील उद्यानांसहीत विविध भागात ही रोपे लावण्यात आली. दरम्यान या संदर्भात सर्वसाधारण सभेत प्रस्ताव गेला. त्यावेळी रोपे एकवट खरेदी करण्याऐवजी टप्याटप्प्याने करावीत, असा ठराव झाला. त्यानुसार प्रशासनाने रोपे खरेदीची प्रक्रिया सुरु केली. पहिल्यांदा निविदा काढल्यावर महापालिकेच्या अटी व निकष पूर्ण करणारे मक्तेदार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे आयुक्तांच्या मंजुरीनंतर दुसऱ्यांदा निविदा काढल्या. त्यानुसार आता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Latest Marathi News Live Update : "मोहोपे" स्टेशनचे नाव "पोयंजे" रेल्वे स्टेशन असे करण्यात येईल

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

SCROLL FOR NEXT