पश्चिम महाराष्ट्र

मैत्रिणीचा नंबर देणे तिच्या आले अंगलट

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (जि.सातारा) ः मोबाईलवर मेसेज पाठवून लग्न न केल्यास ठार मारेन, अशी धमकी देत केलेल्या छळास कंटाळून विभागातील अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. नऊ मार्चला पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी अमिन शिकूर इनामदार (वय 18) या संशयिताला अटक केली आहे. अमीनला मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलीसही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त महिलांनी पोलिस ठाण्यात केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संबंधित अल्पवयीन मुलीने विष प्राशन केल्यानंतर तिला सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारास नेण्यात आले. रुग्णालयात असताना संबंधित मुलीने तिच्या नातेवाईकांना झालेल्या त्रासाबद्दल सांगितले. गावातून शाळेसाठी जाताना मार्गावर नेहमीच अमिन इनामदार हा त्रास देत होता. त्यानंतर त्या मुलीच्याच वर्गातील अन्य अल्पवयीन मुलीने तिचा मोबाईल नंबर अमिनला दिला. त्यानंतर संशयिताने त्या मुलीच्या मोबाईलवर संपर्क करण्यास सुरुवात केली. तो तिला मेसेज पाठवू लागला. तिला "लग्न कर नाही तर ठार मारीन' अशा त्याने वेळोवेळी धमक्‍या दिल्या. तो तिचा दररोज पाठलाग करायचा. मेसेज पाठवून तिचा छळ करायचा. त्यामुळे या त्रासाला कंटाळून संबंधित मुलीने पाच मार्च रोजी मध्यरात्री विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

चार दिवस मृत्यूशी झुंज देणारी अल्पवयीन मुलगीचा नऊ मार्चच्या पहाटे मृत्यू झाला. त्तिच्या नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अमिन इनामदारवर गुन्हा नोंद केला. त्यास अटक केली आहे. तो सध्या चार दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. पोलिस उपनिरीक्षक मोहन तलबार तपास करत आहेत.

वाचा : CoronaVirus : जग कसे बदलेल सांगणारा टिकटाॅक व्हिडिओ

हेही वाचा : सासूच्या अंत्यविधीला येताना सुनेचा अपघात; दोघींना एकाच वेळी अग्नी

वाचा : त्याला वाचविण्यासाठी धुळवडीचा सण बाजूला ठेवून अख्खे गाव  जमले तळयाकाठी

वाचा :  ग्राहकांनाे बिनधास्त रहा ही बॅंक सेफ; अफवांवर विश्वास ठेवू नका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT