rohit patil
rohit patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

आज आबा असते तर...; वडिलांच्या आठवणीने रोहित पाटील भावूक

सकाळ डिजिटल टीम

'मला आज आबांची आठवण येतेय' अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

सांगली - कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) एक हाती सत्ता मिळवली. नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा आणि शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले. सांगलीतील या चुरशीच्या निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार एंट्री केली. जिल्ह्यातील कवठे महंकाळमध्ये आर.आर. पाटील (R.R. Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांनी मारलेल्या या बाजीमुळे सर्व स्तरातून त्यांनी कौतुकाची थाप मिळवली आहे.'मला आज आबांची आठवण येतेय' अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. कवठे महाकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवण्याचं हे आबांच स्वप्न होतं. आज राष्ट्रवादीला (NCP) बहुमत मिळालं, आबांचं स्वप्न पूर्ण झालं असंही रोहित पाटील म्हणाले.

दरम्यान आज त्यांच आणखी एक ट्वीट समोर आलं आहे. यात त्यांनी वडिल आर. आर. आबा यांच्यासोबतचा एक जुना फोटो (Social media) पोस्ट केला आहे. आज आबा असते तर..! अशा आशयाची एक भावनिक पोस्ट आणि लहानपणीचा वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या निवडणुकीच्या (Nagar panchayat election) काळात प्रचारावेळी विरोधकांनी वडील हा शब्द वापरण्याऐवजी बाप शब्द वापरला होता. त्यांचाच धागा पकडून मी विरोधकांना बाप आठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. मला आज आबांची आठवण येतेय, असं भावनिक वक्तव्या त्यांनी केलं होतं.

या निवडणुकीनंतर राजकारणात अगदी लहान वयात प्रवेश केलेल्या आणि यश मिळवलेल्या राजकारणातील दिग्गजांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे. याशिवाय सोशल मिडियावरही अनेकांनी त्यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT