पश्चिम महाराष्ट्र

दगडाने ठेचून युवकाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुसेगाव (जि.सातारा)  बुधावलेवाडी (ता. खटाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग धरून झालेल्या वादावादीतून एकाला पाच जणांनी दगडाने ठेचून मारल्याची घटना उघडकीस आली. पुसेगाव पोलिस ठाण्यात मृत व्यक्तीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंमत देवबा बुधावले (वय 28) असे मृताचे नाव आहे.
 
घटनेनंतर दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांची माहिती अशी, की बुधावलेवाडी, विसापूर (ता. खटाव) गावच्या हद्दीत खिंड नावाच्या शिवारातील कोकाटे तलावात हिंमत देवबा बुधावले (वय 28) व त्याचे नातेवाईक प्रकाश महादेव मदने हे दोघे जण मासेमारीसाठी गेले होते.

पाण्यात जाळे टाकून हिंमत पाण्यातून बाहेर येत असताना गावातील बाळू गजानन बुधावले, संजय गजानन बुधावले, गजानन रंभाजी बुधावले, अमित नानासाहेब बुधावले व सूरज नानासाहेब बुधावले यांनी तेथे येऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून हिंमतला धक्काबुक्की केली. या वेळी प्रकाश मदनेला सूरज व संजय बुधावले यांनी दगड फेकून मारले. बाळू व अमित बुधावले यांनी हिंमतला तलावाबाहेर ओढून काढले. त्यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले. त्यानंतर संजय व गजानन बुधावले यांनी हिंमतचे पाय धरले, तर अमित बुधावलेने त्याचे दोन्ही हात धरले. त्याचवेळी बाळू बुधावले व सूरज बुधावले यांनी बाजूचे दगड उचलून हिंमतच्या डोक्‍यात व तोंडावर मारले. त्यानंतर संजय बुधावले, गजानन बुधावले, अमित बुधावले यांनीही पडलेले दगड उचलून हिंमतला ठार मारले. घटनेची फिर्याद हिंमतचे वडील देवबा गुण्याबा बुधावले (वय 75) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली. घटनेतील संशयित अमित बुधावले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके तपास करत आहेत. 

CoronaVirus : बाप रे ! महाराष्ट्रात सातारा सोळाव्या क्रमांकावर

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

लाॅकडाऊनमध्ये मिरची झाली तिखट; खिशाला फोडणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : "चंद्रकांत पाटील पालकमंत्री असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती" - खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गोरेंवर टोला

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... संजू सॅमसन IN; आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI

‘कोई मिल गया’ वीण दोघांतली…’मधील कलाकारांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

SCROLL FOR NEXT