पश्चिम महाराष्ट्र

झटपट पैसे कमवण्यासाठी युवकांच्या माध्यमातून दारुचा पूरवठा

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि.सातारा)  : बंद काळात परजिल्ह्यातून चोरट्या मार्गाने दारू विक्रीसाठी आणण्याचे सत्र या परिसरात सुरूच आहे. झटपट पैसे कमवण्यासाठी काही युवक दारू सप्लायर्स बनल्याची धक्कादायक बाबही पोलिसांच्या कारवाईतून पुढे आल्याने चिंतेचा सूर उमटत आहे. येथील पोलिसांनी काळगाव (ता.पाटण) परिसरातील डोंगरात रचलेल्या सापळ्यात काल पुन्हा दोन सप्लायर्स सापडले. दोघेही 20 ते 30 वयोगटातीलच आहेत.
 
ढेबेवाडी विभागात परवानाप्राप्त दारू दुकानांव्यतिरिक्त चोरीछुपे चालणाऱ्या दारू अड्ड्यांची व्याप्ती मोठी आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे विभागातील दारू दुकाने, बिअर बार-परमीट रूम उत्पादन शुल्क विभागाने सील केली आहेत. तरीही चोरट्या मार्गाने दारू विक्रीचा बाजार अनेकांनी सुरू ठेवला आहे. कऱ्हाड व शिराळ्याचे अवैध दारूविक्रीचे ढेबेवाडी कनेक्‍शन आतापर्यंत अनेकदा उघडकीस आले आहे. सध्याच्या बंदकाळात तर येथे पुन्हा पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसते. त्याशिवाय येथील काही दारू दुकानांतूनही बाटल्यांना पाय फुटल्याची चर्चा आहे. ज्यांनी कारवाई करायची, तो उत्पादन शुल्क विभाग सुस्तच असल्याने बंद काळातील नाकाबंदी, मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत रस्त्यावर भर उन्हात ड्युटी बजावणाऱ्या येथील पोलिसांनी आता अवैध दारूविक्री विरोधातही धडक मोहीम हाती घेतली आहे.

ढेबेवाडी-कऱ्हाड हा मुख्य मार्ग बंद असल्याने दारू सप्लायर्सनी शिराळा-काळगाव या डोंगरमार्गे या विभागात दारूचा पुरवठा सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. 140 रुपयांना मिळणाऱ्या दारूच्या बाटलीची किंमत काळ्या बाजारात चक्क साडेचारशे झाल्याने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असून, विशेषतः 20 ते 30 वयोगटातील युवक दुचाकी व चारचाकी वाहनांतून दारू वाहतूक करत असल्याचे येथील पोलिसांनी आठवडाभरात केलेल्या दोन मोठ्या करवाईतून समोर आलेले आहे. काल सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काळगावच्या डोंगरातून सुरू असलेली अवैध दारू वाहतूक रोखून दुचाकी व विदेशी दारूच्या बाटल्या असा सुमारे 34 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघा युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. श्री. भजनावळे यांच्यासह फौजदार विजय पाटील, प्रशांत चव्हाण, ज्ञानदेव मुळगावकर, राजेंद्र काळे, अशोक खवळे, कपिल आगलावे, आर. व्ही. शेळके आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला. 


अवैध दारूविक्री विरोधात सुरवातीपासूनच कडक पाऊल उचलले आहे. ही मोहीम आणखी कडक केली आहे. नागरिकांनीही असा प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. 
- उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरीक्षक, ढेबेवाडी 

शासकीय कार्यालयात चाेरी; लाखाे रुपयांच्या दारुच्या बाटल्या पळविल्या 

Lockdown : पाेलिस तपास सुरु; हजाराे दारुच्या बाटल्या चाेरीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT