पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड शहराची चिंता वाढवणारा असा आहे ग्राऊंड रिपाेर्ट

सचिन शिंदे

कऱ्हाड : म्हासोली येथील सापडलेल्या कोरानबाधीत रूग्णांने त्याचा अहवाल पॉझीटिव्ह येण्यापूर्वी तीन दिवसांपूर्वीच येथे खासगी हॉस्पीटलमध्ये तपासणी करून गेला होता. त्या रूग्णाने केलेल्या प्रवासात संबंधित माहिती सांगितल्याने ही गोष्ट उघडकीस आली आहे. त्यामुळे त्या सबंधित हॉस्पीटलच्या डॉक्टर्ससह तेथील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन केले आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. संबंधित रूग्ण त्या हॉस्पीटलमध्ये डोकेदुखी व ताप आल्याने तपासण्यासाठी आला होता, अशीही माहिती समोर आली आहे. म्हासोलीच्या कोरानबाधीत रूग्णाचा कऱ्हाड शहरातील प्रवास पुन्हा एकदा शहराला चिंतेत टाकणारा ठरणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लाॅकडाऊन : धीर धरा आणि आशा कधीच सोडू नका !

 
शहरात तीन दिवस आधी प्रवास केलेल्या म्हासोलीच्या कोरानाबाधीतामुळे शहरातील काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिका व नागरी आरोग्या सुविधा केंद्र सावध झाले आहे. कऱ्हाडची आजची सकाळ कोरोनाच्या रूग्णांचा अहवाल पॉझीटिव्ह घेवूनच उजाडली आहे. तालुक्यातील म्हासोली गावात काल परवा सापडलेल्या कोरोनाबाधीताच्या सहवासातील पाच जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे कऱ्हाडची आजची सकाळ धक्कदायक ठरली आहे. त्या पाच कोरोनाबाधीतापैकी एकजण कऱ्हाड शहरात फिरून गेल्याची माहिती त्याच्या प्रवासात समोर आली. त्यामुळे पालिकेसह नागरी आरोग्य केंद्र आणि आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यानुसार ती संबधित व्यक्ती त्रास होत असल्याने सुमारे तीन दिवसांपूर्वी कऱ्हाडच्या खासगी हॉस्पीटलमधून तपासून गेल्याची धक्कादायक माहिती यंत्रणेच्या हाती लागली. त्यानुसार पालिका व नागीर आरोग्य केंद्राने त्याबाबतची सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी त्या हॉस्पीटलमधील डॉक्टरसह तेथील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्यांच्याकडूनही सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. त्यातील गंभीर व नार्मल असे सहवासीतही शोधण्याचे काम सुरू होते.


शहरात यापूर्वीच तीन ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधीत झोन जाहीर केला आहे. त्या भागातील एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तरीही सुक्ष्म कन्टेनमेंट झोन कायम आहे. मंगळवार पेठ व रूक्मिणीनगर परिसरातील दोन वेगवेगळे रूग्ण कोरोनाबाधीत सापडले आहेत. दोन्ही रूग्ण उपजिल्हा रूग्णालयातील परिचारिकांच्या सहवासात आले होते. त्यामुळे त्या दोन्ही महिला बाधीत ठरल्या होत्या. मात्र त्यांच्यापुढे ती साखळी सरकली नाही. ती गोष्ट लक्षात घेवून प्रशासनाने रूक्मीणनगर, मंगळवार पेठ व उपजिल्हा रूग्णालय परिसरात सुक्ष्म कन्टेनमेंट झोन जाहीर केला आहे. ती स्थिती थोडीशी निवळू लागलेली असतानाच म्हासोलीत सापडलेल्या कोरोनाबाधीताचा शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये तीन दिवसा पूर्वी झालेला प्रवास व त्याची तेथे झालेली तपासणीचा प्रवास कऱ्हाडकरांची चिंता वाढवणारा ठरतो आहे.

कामगिरी फत्ते : घरापर्यंत काेट्यावधी रुपये पाेचले 

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारींना कऱ्हाडला येण्याच्या आमंत्रणाचा निर्णय

काेणत्या राज्याने महाराष्ट्राकडे मदतीची याचना केली आहे वाचा सविस्तर.....

अजित पवार,जयंत पाटलांनी करुन दाखवलं; यांच्या गाेलगप्पाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT