पश्चिम महाराष्ट्र

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष

हेमंत पवार

कऱ्हाड : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. अशातच किवळ (ता.कऱ्हाड) येथील शासकीय अधिकारी तानाजीराव साळुंखे व माई साळुंखे यांची कन्या तेजस्वी आणि चंद्रपुर येथील भारतीय वनसेवेतील अधिकारी राहुल पाटील यांचा शनिवारी (ता.2) नियोजीत विवाह होणार होता. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न लांबणीवर टाकावे लागले. तरीही सामाजिक भान राखुन संबंधित नियोजीत दाम्पत्याने लग्नाच्या तारखेची (दाेन मे)  आठवण म्हणुन कोरोनाच्या संकटातुन सावरण्यासाठी सरकारला हातभार म्हणुन तब्बल एक लाखांचा निधी दिला.

किवळ येथील श्री. साळुंखे व माई साळुंखे यांची कन्या तेजस्विनी ही एक उत्तम उद्योजीका आहे. तर बिळाशी-चरण (ता. शिराळा) येथील राहुल पाटील हे भारतीय वनसेवेत चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टप्याटप्याने लॉकडाऊन वाढवण्याची कार्यवाही केली आहे. त्यामुळे कार्यक्रम, सण, उत्सवावरही बंदी घालण्यात आली आहे. अशातच आज संबंधित नियोजीत दाम्पत्याचा विवाह मुहूर्त आज होता. मात्र लॉकडाऊनमुळे या दोघांचा नियोजीत विवाह लांबणीवर टाकावा लागला आहे.

कोरोनाच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या नियोजित वधू- वराने सामाजिक बांधीलकीतून लग्नाच्या मुहूर्ताची आठवण म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपये वर्ग केले.

नियोजित वर राहुल पाटील व वधू तेजस्वी साळुंखे यांनी लनश्‍चित झालेल्या लग्नाच्या मुहूर्ताची आठवण म्हणुन दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या या निर्णयाचे खासदार सुळे यांनीही कौतुक केले आहे. फोन करुन आणि व्टिटरवर त्यांनी या दोघांसाठी खास संदेशही पाठवला असून त्यांनी नियोजीत दाम्पत्याचे अभिनंदनही केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या वाघोलीजवळ महामार्गावर अपघाताचा थरार

Agriculture News : पावसाचा फटका! फळांच्या दरात मोठी वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ हजार कॅरेटची आवक थेट ८०-९० वर

Pune Accident Video: पुण्यात टायर निघालेली कार भरधाव.. मद्यधुंद चालकाचा प्रताप, 'सकाळ'च्या प्रतिनिधीमुळे टळला मोठा अनर्थ

बाबो! लग्नानंतर सामंथाच्या नवऱ्याने दिलं भलं मोठं गिफ्ट, नणंदेची पोस्ट व्हायरल

Budha Gochar 2025: या महिन्यात बुध ग्रहाची चाल 5 वेळा बदलणार; या 3 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ!

SCROLL FOR NEXT