पश्चिम महाराष्ट्र

...तर लोधवड्यात अनर्थच घडला असता

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि.सातारा)  : मृत वृद्धाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला खरा; परंतु हा अहवाल येण्यापूर्वीच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवून खबरदारी घेतली अन्‌ मोठा धोका टळला. त्यामुळे लोधवडेतील रामराज्यासाठी "लक्ष्मण' धावून आल्याची भावना व्यक्त होत आहे. मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरल्याची चर्चा परिसरात आहे.
 
ग्रामविकासासाठी लोधवडेकरांची एकजूट सर्वज्ञात आहेच. या लोकबळातून अनेक संकटांवर मात करून गाव स्वावलंबनाच्या दिशेने चालले आहे. लोधवडेकरांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करतच कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मुंबईहून मूळगावी आलेल्या एका कुटुंबातील वृद्धाचा अचानक मृत्यू झाला अन्‌ सारा गाव हादरला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने त्यांना विलगीकरणात ठेवले होते. मृत व्यक्ती गावातील स्वतंत्र खोलीत तर इतर कुटुंबिय गावालगतच्या घरात राहत होते. परंतु, अचानक वृद्धाचा मृत्यू झाल्यावर गावातील लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. परिणामी मृत व्यक्तीजवळ कोणीच जाण्याचे धाडस करत नव्हते. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर यांनी रात्री उशिरा घटनास्थळी पोचून मृतदेह तपासणीसाठी फलटणला हलविला. मूळव्याध व दम्याचा त्रास असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली असली तरी, आरोग्य विभागाने खबरदारी घेतली.
 
मृतदेहाचा स्वॅब घेतल्यानंतर पुन्हा वरिष्ठांशी संपर्क साधून डॉ. कोडलकर यांनी मृतदेह कुटुंबीयांकडे न देण्याचा धाडसी निर्णय घेतला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकरवी तिथेच सर्व काळजी घेऊन अंत्यसंस्कारही उरकले. हेच लोधवडेकरांच्या पत्त्यावर पडले. कारण भावनिक होऊन हा मृतदेह कुटुंबीयांकडे दिला असता तर नक्कीच मोठा अनर्थ झाला असता. गावातील अनेक लोक व नातेवाईक हे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी कदाचित जमलेही असते. परंतु, लोधवडेचे रामराज्य टिकविण्यासाठी डॉ. कोडलकरांच्या माध्यमातून "लक्ष्मण'च धावून आला असेच म्हणावे लागेल. 

सातारा : जवानांकडून क्वारंटाइनमध्येही आगळी कृतज्ञता

हरवलेले पाकीट सोशल मीडियामुळे परत, जवान व गुरुजींची तत्परता

कंबरडं मोडलं... कुटुंबही फरफटलं...

लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

Wai Bhuinj Police Action: भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद, सहा जनावरांच्या चोरीची कबुली

SCROLL FOR NEXT