पश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने विषम तारखांना उघडणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सर्व आस्थापना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, बहुतांश नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे व बाजारपेठेत अनावश्यक गर्दी होत असल्याने कोरोना विषाणुचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये दुकान उघडण्यासाठी विषम (एक, तीन. पाच, सात) तारखा दिल्या आहेत. या  प्रतिबंधात्मक अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

हे आदेश सातारा तालुक्यातील लिंब, खेड, शाहुपूरी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, नागठाणे, अतित, काशिळ. कोरेगाव तालुक्यातील कुमठे, पाडळी स्टेशन, पिंपोडे बु, वाठार (किरोली), वाठार स्टेशन. माण तालुक्यातील पळशी, गोंदवले बु, बिदाल. फलटण तालुक्यातील आसू, विडणी, कोळकी, गुणवरे, बरड, गिरवी, सांगवी, पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी). खंडाळा तालुक्यातील शिरवळ. वाई तालुक्यातील बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, यशवंतनगर. जावली तालुक्यातील कुडाळ. कराड तालुक्यातील आटके, ओंड, उंब्रज, बनवडी, चरेगाव, गोळेश्वर, काले, कार्वे, विंग, कोपर्डे हवेली, मसूर, मुंढे, पाल, रेठरे बु, सदाशिवगड, सैदापूर, शेरे, तांबवे, वडगाव हवेली, वारुंजी. खटाव तालुक्यातील बुध, खटाव, पुसेगाव, चितळी, मायणी, कलेढोण, कुरोली (सिद्धेश्वर), निमसोड, पुसेसावळी, औंध व पाटण तालुक्यातील तारळे या पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना लागू राहील.

या आदेशानुसार प्रशासनाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील हॉस्पीटल्स, नर्सिग होम व खासगी डॉक्टरचे क्लिनिक (ओपीडी) 24 तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील किरणा दुकाने, औषधांची दुकाने (मेडिकल) शेती संबंधी औषधांची दुकाने, खते व बी-बियाणांची दुकाने दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच सुरु ठेवावीत. उर्वरित सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने केवळ विषम तारेखस सकाळी अकरा  ते दुपारी चार या वेळेतच चालू राहतील. ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडील आदेशातील अटींच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधिताचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच या ओदशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897, दंड प्रक्रिया संहिता, 1973, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

पोलिस ठाण्यातच फिल्मी स्टाइल मारामारी; महिला पोलिसालाही ढकलून दिले

उशिरा का हाेईना शाळांसाठी आली दिलासादायक बातमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

SCROLL FOR NEXT