पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडकरांसाठी गुड न्यूज; पालिकेच्या पुढाकाराचा झाला गवगवा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः केंद्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये घेतलेल्या कचरामुक्त शहर स्पर्धेत कऱ्हाड शहराला थ्री स्टार मानांकन मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2019 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या पालिकांत कऱ्हाडने देशात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या कचरामुक्त शहरातही कऱ्हाडला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. 

पालिकेतील लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम केल्याने थ्री स्टार मानाकंन मिळाले आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2020 साठी घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत निकाल नंतर जाहीर होणार आहे. शहराला स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक, हागणदारीमुक्त शहर व त्यानंतर मिळालेले कचरामुक्त शहरचे थ्री स्टार मानांकनही वेगळी ओळख करून देणारे ठरते आहे.

कऱ्हाडसह भिवंडी, चंद्रपूर, धुळे, गडहिंग्लज, इंदापूर, जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मीरा भाईंदर, मुरगुड, नारखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, सासवड, शिर्डी, तासगाव, वडगाव, वेंगुर्ला, विटा यांचाही समावेश आहे. 

कर्जमाफीत असूनही लाभ न मिळालेल्यांना खरिप कर्ज मिळणार : बाळासाहेब पाटील

अरे बापरे... विनापरवानगी येताहेत लोंढे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT