पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : महाबळेश्वर, कोरेगावात कोरोना बाधित; एकूण बाधितांची संख्या 118

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः कोरेगाव येथे पुण्यावरून आलेला 36 वर्षीय तरुण आणि मूळ महाबळेश्वर रहिवाशी मुंबईवरून आलेला 23 वर्षीय विद्यार्थी हे दोघेही आज (रविवार) कोरोना बाधित आढळल्याचा आहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे काेरेगाव आणि महाबळेश्वरात काेराेनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान रात्री उशिरा पारले (ता. कऱ्हाड) येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 118 वर गेली असून, यापैकी 94 रुग्ण उपचार घेत आहेत. 20 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला. एकट्या कऱ्हाड तालुक्‍यात 87 रुग्णसंख्या झाली आहे.

शनिवारी (ता.9) दिवसभरात एकूण 219 संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, कऱ्हाड, सातारा, फलटण व वाई येथील रुग्णालयांत नव्याने 258 संशयित दाखल झाले आहेत. कऱ्हाड तालुक्‍यातील पारले येथील कोरोना सेंटरमधील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण कोरोना रुग्णाच्या निकट सहवासित आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील दहा रुग्णांपैकी दोन महिला पोलिसांसह इतर आठ रुग्ण, कृष्णा मेडिकल कॉलेज कऱ्हाड येथे 94, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड येथील 92, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 14, तर ग्रामीण रुग्णालय वाई येथील नऊ असे एकूण 219 संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 
शनिवारी (ता.9) दिवसभरात कोरोना संशयित म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 30, कृष्णा मेडिकल कॉलेज कऱ्हाड येथे आठ, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 179, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 14 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 27 असे एकूण 258 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  
ज्या कोरोना बाधित रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा 17 रुग्णांचे नमुने, तसेच नव्याने विलगीकरण कक्षात दाखल झालेले 258 रुग्णांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली. 

अजित पवार,जयंत पाटलांनी करुन दाखवलं; यांच्या गाेलगप्पाच

त्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT