पश्चिम महाराष्ट्र

हुशश ! महाबळेश्वर आजही काेराेनामुक्तच; कैदी सुरक्षित स्थळी नेले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे मुंबईहून प्रवास करुन आलेला 23 वर्षीय युवक व पुणे येथून प्रवास करुन आलेला आठ मे दिवशी विलगीकरण कक्षात दाखल केलेला 36 वर्षीय पुरुष असे एकूण दाेन जण कोविड-19 बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
अजित पवार,जयंत पाटलांनी करुन दाखवलं; यांच्या गाेलगप्पाच

सातारा येथील 50 वर्षीय कॅन्सरपिडीत रुग्ण उपचारासाठी पुणे येथे गेला असता तो कोविड बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आय. सी. एम. आर. पोर्टलमध्ये सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण तीन नवीन कोविड-19 बाधित रुग्णांची नोंद झाली असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 119 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 97, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले दाेन रुग्ण आहेत. दरम्यान महाबळेश्वर येथील मूळ विद्यार्थी मुंबईहून आल्यानंतर थेट जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने महाबळेश्वर काेराेनामुक्त असल्याचे स्पष्ट हाेत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील 50 वर्षीय कॅन्सरपिडीत रुग्ण उपचारासाठी पुणे येथे गेला असता ते कोविड बाधित झाल्याने सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या 119 पर्यंत गेली आहे. 

सातारा जिल्ह्यातील टाॅप बातम्या वाचा 

त्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज 

घरीच रहा सुरक्षित रहा ;शाळा प्रवेशाची काळजी करु नका. सविस्तर बातमी वाचा कधी हाेणार प्रक्रिया सुरु

ब्रेकिंग : महाबळेश्वर, कोरेगावात कोरोना बाधित; एकूण बाधितांची संख्या 118

दरम्यान सातारा जिल्ह्यातील सातारा कारागृऱ्ह येथे काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्यातील कैदी आणण्यात आले हाेते. त्यापैकी काही जण काेराेना बाधित झाले आहेत. परिणामी अन्य कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 20 ते 25 कैदी सातारा कारागृहातून  अन्यत्र ठिकाणी हलविण्यात आले आहेत. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT