पश्चिम महाराष्ट्र

घरीच रहा सुरक्षित रहा ;शाळा प्रवेशाची काळजी करु नका

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः प्राथमिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाने बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्‍के राखीव जागा  मोफत शिक्षणाची सोय केली आहे. त्यात जिल्ह्यातील 234 शाळांतील दोन हजार 120 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात आहे. पालकांनी ऑनलाइनद्वारे भरलेल्या तीन हजार 105 अर्जानंतर जिल्ह्यातील एक हजार 875 विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे. आता लॉकडाउन उठल्यानंतर लॉटरीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पडताळणी समितीकडे जाऊन पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
 
प्राथमिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार अंमलात आणला. त्यातंर्गत 25 टक्के जागांवर समाजातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता यावे, याची सोय केली. त्याची शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्रक्रिया राबवली जाते. आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरून पालकांना या प्रक्रियेस सामोरे जावे लागते. त्यानुसार आरटीईअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील 234 शाळांसाठी ऑनलाइनद्वारे पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज भरले. जिल्ह्यातील 234 शाळांमध्ये आरटीईच्या दोन हजार 131 जागा आरक्षित आहेत.

त्यासाठी अर्ज भरल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील आरटीईच्या प्रवेशासाठी 14 मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील एक हजार 875 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या संकट थोपवण्यासाठी लॉकडाउन सुरू झाल्याने पुढची प्रक्रिया सध्या स्थगित केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित पंचायत समितीतील शिक्षण विभागात पडताळणी समितीत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, राज्यात सर्व ठिकाणी सध्या लॉकडाउनमुळे त्या प्रक्रियेस स्थगिती मिळाली आहे. लॉकडाउन उठल्यानंतर त्या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर लॉटरीद्वारे प्रवेश मिळणार असून, जे कोण प्रवेश घेणार नाहीत, त्या रिक्त होणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्यानुसार त्या पालकांना "एसएमएस'द्वारे त्याची माहिती मिळते. 

आरटीई'अंतर्गत लॉटरीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना "एसएमएस'द्वारे संदेश गेला आहे. त्यांच्या कागदपत्रांची तालुकास्तरावरीय समितीकडून पडताळणी होणार आहे. लॉकडाउनमुळे ती झालेली नाही. ऑनलाइन पोर्टलवर सूचना येईल, त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT