पश्चिम महाराष्ट्र

जमीन वहिवाटीवरुन शेतकऱ्याचा खून; 17 जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मसूर (जि.सातारा) ः जमिनीच्या वहिवाटीवरून झालेल्या मारहाणीत पशुसंवर्धन दवाखान्यातील कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. याप्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. राजाराम भगवान येडगे (वय 55) असे मृताचे नाव आहे. माळवाडी (ता. कऱ्हाड) येथे रविवारी (ता. 29) दुपारी साडेचार वाजता एकाच कुटुंबातील सहा जणांना धारदार शस्त्राने मारहाण झाली होती. त्यात येडगे हे गंभीर जखमी झाले होते. अन्य पाच जण जखमी असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील आरफळ कॉलनीनजीक रामोशी समाजाची दफन भूमीची जागा आहे. त्याला कुंपन केले आहे. कुंपनाबाहेर दहा गुंठे जागा आहे. तेथे धनाजी गावडे (रा. माळवाडी) यांची वहिवाट आहे. ही जागा रामोशी समाजाने वहिवाट करण्याचे ठरवले होते. त्यानुसार समाजाचे प्रमोद चव्हाण यांनी अजित येडगे यास ट्रॅक्‍टरने सरी सोडण्यासाठी सांगितले होते. त्यासाठी अजित हा ट्रॅक्‍टर घेऊन जागेत गेला होता. त्या वेळी गावडे याने "तेथे सरी सोडू नको,' असे सांगितले.

रविवारी रात्री साडेआठ वाजता माळवाडी येथे घराबाहेर राजाराम येडगे हे कुटुंबासमवेत बसले होते. जागेत सरी सोडण्याच्या वादातून धनाजी गावडे, बबन पोकळे, अंकुश पोकळे, विशाल पोकळे, किरण गावडे, विशाल गावडे, अनिल गावडे, सतीश गावडे, संभाजी गावडे, तानाजी गावडे, संतोष पोकळे, किशोर गावडे, प्रताप पोकळे, अमोल घुटुगडे, लक्ष्मी पोकळे, छाया गावडे, भाग्यश्री गावडे (सर्व रा. माळवाडी) यांनी कुऱ्हाड, चाकू, काठी, लोखंडी गज, दगडाचा वापर करीत कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. त्यात डोक्‍यास मार लागल्याने येडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील अजय येडगे, योगेश गडाळे, सुजाता येडगे, मुक्ताबाई येडगे जखमी झाले आहेत. अजित येडगे याने पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक एस. पी. जाधव व सतीश मयेकर तपास करीत आहेत.

सातारकरांना घरोघरी दूध मिळणार

कऱ्हाड : एका क्लिकवर मिळवा किराणा माल घरपाेच

चिंताजनक ! कोरोनानंतर आता सारीने दाेघांचा मृत्यू

सातारा, कऱ्हाडात निर्बंधावर जिल्हाधिकारी ठाम, ग्रामीण भागाला दिलासा 

घरगुती साहित्यातून युवकांनी चक्क साकारला कुलर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT