Satyabhama Inamdar Preparation For Nation Competition By her Old Cycle 
पश्चिम महाराष्ट्र

सत्यभामाची जुन्या सायकलने राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी

अजित कुलकर्णी

सांगली - सत्यभामा प्रशांत इनामदार... सांगलीवाडीतील तरुणी. सातवीत असल्यापासून ती सायकलिंग करते. आजोबांनी तिच्यासाठी घेतलेली सायकल ती अजून वापरते. त्याच जुनाट सायकलने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. महागडी सायकल, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, तज्ज्ञ प्रशिक्षक, सकस आहार, हेल्मेट, शूज असले काहीच तिला मिळाले नाही. गरिबीशी दोन हात करता करता तिची नुकतीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय. आताही ती त्याच जुन्या सायकलने स्पर्धेसाठी तयारी करतेय. 

अनेकांकडे तिने नव्या सायकलसाठी मदत मागितली, हात पसरले; पण तिचा आवाज कुणी ऐकलाच नाही. इनामदार हिचा परिस्थितीशी सतत सुरू असलेला संघर्ष कधी संपणार, हा प्रश्‍न कायम आहे. येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात ती पदवीच्या पहिल्या वर्षात शिकतेय. राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेत ती सायकलने यायची. घर ते शाळा हे अंतर दीड-दोन किलोमीटर, मात्र या प्रवासात तिचे आणि सायकलचे नाते चांगलेच जमले. रोजच्या सायकलिंगच्या जोरावर तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत नववी व दहावीत प्रथम क्रमांक मिळवला. या यशाने तिचा आत्मविश्‍वास वाढला. आता ती स्पर्धा म्हणून या खेळाकडे पाहू लागली. राज्य स्पर्धेसाठी ती तीच सायकल घेऊन गेली. तिचा तेथे टिकाव लागला नाही. इतर मुलींकडे महागड्या, गिअरच्या, कमी वजनाच्या सायकली होत्या. नुसता सराव असून उपयोग नाही तर स्पर्धेसाठी सायकलही दर्जेदार हवी, हे सूत्र तिला उमगले. तिने नाउमेद न होता सराव सुरु ठेवला. अकरावी, बारावीतही तिने पुरोहित कन्या शाळेकडून खेळताना स्पर्धा गाजवल्या.

चिखलीतील आंतरविभागीय स्पर्धेत धडक

नुकतीच तिने चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेत धडक मारली. तिची ऑल इंडिया विद्यापीठ संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत चमकण्यासाठी तिचा रोज सकाळी ६ पासून १६ ते २० किलोमीटर सराव सुरु आहे. इतरांकडे ३५ हजारापासून ते १० लाख रुपयांपर्यंच्या सायकली आहेत. ती त्याच जुन्या सायकलने स्पर्धेत उतरणार आहे. दानशूर व्यक्‍ती, संस्थांनी तिला मदत केल्यास  ती सांगलीचे नाव रोशन करेल, असा विश्‍वास आई-वडीलांना आहे.

लेकीच्या यशासाठी बापाचे कष्ट

सत्यभामा इनामदारचे वडील खासगी नोकरी करतात. आई शिवणकाम करते. महापुरात त्यांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले आहे. लेकीच्या यशासाठी ते पोटाला चिमटा घेऊन राबतात. लेकीने चिखलीच्या स्पर्धेसाठी जाताना सायकलचे वजन कमी होण्यासाठी चेनगार्ड, मडगार्ड व इतर साहित्य बाजूला काढताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT