Senior leader Ramnath Wagh dies 
पश्चिम महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते रामनाथ वाघ यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा

नगर : नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद व जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष, तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ विश्‍वस्त आणि यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे अध्यक्ष ऍड. रामनाथ वाघ (वय 87) यांचे आज सायंकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. 

(कै.) वाघ यांच्या मागे पत्नी व चार मुलगे असा परिवार आहे. (कै.) वाघ यांचे पार्थिव उद्या (गुरुवारी) सकाळी साडेदहाला जिल्हा मराठा संस्थेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सकाळी साडेअकराला अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुण्यातील यशोवर्धन एंटरप्रायजेस या संस्थेचे संचालक उदय वाघ, जिल्हा सहकारी लेबर फेडरेशनचे नेते जयंत वाघ, रेडिओलॉजिस्ट डॉ. धनंजय वाघ, बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर वाघ यांचे ते वडील होत. 
विविध पदांच्या माध्यमातून आपल्या आगळ्यावेगळ्या कामाची किमया दाखविणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ऍड. वाघ यांचा लौकिक होता. त्यांचा जन्म एक ऑगस्ट 1932 रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शालेय शिक्षण सुरू असतानाच किराणा दुकानात काम करावे लागले. पुढे वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलत त्यांनी बीए, एलएल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नगर आणि राहुरीच्या न्यायालयात वकिली करत असताना गोरगरिबांच्या व्यथा-वेदना पाहून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. सन 1972मध्ये त्यांनी राहुरीतून विधानसभा निवडणूक लढविली; मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्याच वर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते वांबोरी गटातून निवडून आले आणि थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1972च्या दुष्काळात त्यांनी रोजगार हमीसह विविध योजना जिल्ह्यात राबविल्या. याच काळात त्यांनी जिल्ह्यात दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यातूनच पुढे जिल्ह्याने दुग्धोत्पादनात राज्यात आघाडी घेतली. तब्बल सात वर्षे ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 

कॉंग्रेस सेवा दल, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि पुढे तब्बल सहा वर्षे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषविले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा सत्याग्रह, शेतकरी संघटना यांमध्येही त्यांनी वेळोवेळी भाग घेऊन तुरुंगवासही भोगला. 

रामनाथ वाघ यांनी भूषविलेली पदे 
- अध्यक्ष, जिल्हा परिषद 
- अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेस 
- विश्‍वस्त, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (1958पासून) 
- उपाध्यक्ष, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज 
- अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण व्यासपीठ 
- कार्याध्यक्ष, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था चालक संघटना 
- अध्यक्ष, कार्यकारी समिती, न्यू लॉ कॉलेज, नगर 
- विश्‍वस्त, काकासाहेब म्हस्के फाउंडेशन ट्रस्ट 
- सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (दहा वर्षे) 
- अध्यक्ष, नगरपालिका शिक्षण मंडळ 
- सचिव, शिशू संगोपन शिक्षण संस्था 
- सचिव, नवभारत छात्र निवास 
- सदस्य, रयत शिक्षण संस्था 
- अध्यक्ष, "वनराई', नगर शाखा 
- संचालक, रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती 
- सरचिटणीस, अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन (16 वर्षे) 
- सरचिटणीस, राष्ट्रीय साखर कामगार युनियन 
- सचिव, नगर शहर वकील संघटना 
- उपाध्यक्ष, राज्य मार्केट कमिटी स्टाफ फेडरेशन 
- उपाध्यक्ष, "इंटक'प्रणीत शुगर फेडरेशन 
- सरचिटणीस, जिल्हा कॉंग्रेस कमिटी 
- संचालक, पाटबंधारे महामंडळ 
- संचालक, जमीन विकास महामंडळ 
- संचालक, शेती विकास महामंडळ 
- संचालक, कृषी औद्योगिक विकास महामंडळ 
- सदस्य, पंचायतराज मूल्यमापन व परिसंवाद समिती  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT