sleeper coach bus-service
sleeper coach bus-service 
पश्चिम महाराष्ट्र

प्रवाशांसाठी खुषखबर...राज्यात आता स्लिपर कोच बससेवा 

तात्या लांडगे

सोलापूर : खासगी वाहतुकीला स्पर्धा करीत दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांना सेवा देणारी आणि सव्वाएक लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता प्रवाशांसाठी गडचिरोली ते रत्नागिरीपर्यंत स्लिपर कोच सेवा सुरू केली आहे. त्यासाठी 200 बस सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 80 बस रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित 120 बस डिसेंबर 2020 पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिली. 


सोलापुरातील मंगळवेढा-बोरोवली, सोलापूर-नाशिक आणि करमाळा-मुंबई या मार्गांवर स्लिपर कोच बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा प्राधान्याने ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. जुनाट झालेली लालपरी, खासगी वाहतुकीची वाढलेली स्पर्धा, इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च आणि प्रत्यक्षातील उत्पन्नात मोठा फरक पडला आहे. शासनाकडून राज्य परिवहन महामंडळाला सवलतीच्या प्रवासापोटी सुमारे बाराशे कोटी रुपये मिळतात. त्यातून महामंडळाची वाटचाल सुरू असल्याची चर्चा आहे. अद्याप कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटलेला नसून आता स्लिपर कोचला मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा मानला जात आहे. 

दोनशे स्लिपर कोचचे नियोजन 
राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने 200 स्लिपर कोच बस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, मुंबई, पुणे, नगर, अमरावती, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 स्लिपर कोच बस सुरू करण्यात आल्या आहेत. 
- राहुल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई 


ठळक बाबी... 

  • डिसेंबर 2020 पर्यंत राज्यात 200 स्लिपर कोच बससेवा सुरू होणार 
  • गडचिरोली ते रत्नागिरी असे वाहतुकीचे निर्माण होणार जाळे 
  • स्लिपर कोच बससेवेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात होणार वाढ 
  • सोलापूर जिल्ह्यातील तीन मार्गांवर तर राज्यातील 40 मार्गांवर स्लिपर कोच बससेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT