पश्चिम महाराष्ट्र

पहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उत्तीर्ण 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या विषयावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यावर सकारात्मक निर्यण घेण्यात त्या यशस्वी झाल्या. पहिल्याच सभेचे कामकाज त्यांनी तब्बल तीन तास चालवले. 

तहकुबीच्या प्रस्तावावरून सभेस सुरुवात 
सभेच्या सुरुवातीलाच कॉंग्रेस, एमआयएमने नागरीकत्वाच्या मुद्यावरून सभा तहकूबीची सूचना मांडली. त्यावर यू. एन. बेरिया यांनी आपले मत मांडले, त्यास भाजपचे श्रीनिवास रिकमल्ले यांनी हरकत घेतली. दरम्यान एमआयएमचे रियाज खरादी यांनी या विषयावर सर्व पक्षाच्या लोकांना बोलण्याची संधी द्यावी, अशी सूचना केली, तर हा विषय सोलापूरशी संबंधित नसल्याने शहरात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती राजकुमार हंचाटे यांनी व्यक्त केली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच त्याला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता होती, त्याचवेळी कॉंग्रेसचा प्रस्ताव बहुमताने फेटाळल्याची घोषणा महापौरांनी केली आणि हा विषय त्या ठिकाणीच संपविला. 

माता रमाईच्या पुतळ्यावरून जुगलबंदी 
डॉ. आंबेडकर उद्यानात माता रमाईचा पुतळा बसविण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि भाजपच्या वंदना गायकवाड यांच्यात पुतळा बसविण्यावरून जोरदार जुगलबंदी झाली. हा पुतळा लोकवर्गणीतून घेण्याची सूचना करतानाच कॉंग्रेसच्या वतीने 51 हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा गटनेते चेतन नरोटे यांनी केली. त्यापाठोपाठ भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप, बसपच्या नगरसेवक-नगरसेविकांनीही आपले एक महिन्यांचे मानधन पुतळ्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यावेळी श्री. चंदनशिवे यांनी माता रमाईचा पुतळा देण्याची घोषणा केली. यावरून पुन्हा शाब्दीक चकमक उडाली. हा विषय भरकटण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रस्तावानुसार पुतळा उभारण्याची घोषणा महापौरांनी केली आणि विषयाला पूर्वविराम दिला.

सभा चालवली यशस्वीपणे

 इतर विषयांवर चर्चा सुरु असताना आवश्‍यक त्या ठिकाणी सूचना देत, प्रसंगी काही नगरसेवकांना खाली बसवत सौ. यन्नम यांनी पहिली सभा अतिशय यशस्वीपणे संपविली. महत्त्वाचे म्हणचे पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसह तातडीने दाखल झालेल्या विषयांवरही निर्णय देऊनच त्यांनी सभा तहकूब केली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यात आली. 

या विषयावर झाले निर्णय 
⚫ महापालिका क्षेत्रातील नर्सिंग होमकडून जादा शुल्क आकारणी नको 
⚫ महापालिका शाळा क्रमांक 11 संदर्भात आयुक्तांचा अभिप्राय घेणार 
⚫ व्यापारी संकुल बाजार भावाने विकण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे 
⚫ सायबर टेकसंदर्भात सविस्तर कागदपत्रे देण्याचा निर्णय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT