Thirty thousand metric tonne chemical fertilizers demand for Mohol taluka 
सोलापूर

अठरा हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा कोटा मंजूर

राजकुमार शहा

सध्या सर्वत्र खरीप हंगाम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्‍यात उडीद, तूर, सोयाबीन या कडधान्यांची पेरणी वाढली आहे.

मोहोळ (सोलापूर) : चालू खरीप हंगामासाठी मोहोळ (Mohol) तालुक्‍याला 18 हजार 864 मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचे (chemical fertilizers) कोटा मंजूर (Approved) झाले असून, तालुक्‍यातील विविध कृषी केंद्र (Agricultural Center) चालकाकडे मागील रासायनिक खतांचा (chemical fertilizers) 7 हजार 400 मेट्रिक टनाचा मागीलसाठा शिल्लक असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. एन. माळी यांनी दिली.

(Approved quota of 18 thousand metric tons of chemical fertilizers for mohol taluka)

सध्या सर्वत्र खरीप हंगाम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्‍यात उडीद, तूर, सोयाबीन या कडधान्यांची पेरणी वाढली आहे. या पिकांची शास्त्रोक्त व शासन नियमाप्रमाणे जोपासना केली तर लाखोंचे उत्पन्न येते. उजनी डावा कालवा, आष्टी जलाशय आदीसह सीना नदी व त्यावरील बंधाऱ्यामुळे पाणी स्त्रोत्र वाढले आहेत. गेल्या दहा वर्षापासून तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे ऊस हे मुख्य होते. तालुक्‍यात चार साखर कारखाने आहेत. मात्र ऊस गाळपास जाताना होणारे राजकारण, वेळेवर न मिळणारे पैसे यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी फळबागांचे क्षेत्र वाढीस लागली आहे. त्यात द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, केळी आदींचा समावेश आहे.

तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. चाऱ्यासाठी व उत्पादनासाठी ही मक्‍याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे मक्‍याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. ऊस, फळबागा तसेच अन्य पिकासाठी रासायनिक खतांना मोठी मागणी असते. त्यात सर्वात जास्त मागणी युरियाला असते.

मंजूर रासायनिक खते (मेट्रिक टन)

युरिया : आठ हजार 206

डीएपी : दोन हजार 856

एमओपी : एक हजार 738

एनपीके : तीन हजार 992

एसएसपी : दोन हजार 72

मागील शिल्लकसाठा (मेट्रिक टन)

युरिया : दोन हजार 725

डीएपी : 484

एमओपी : 598

एनपीके : दोन हजार 433

एसएसपी : एक हजार 151

(Approved quota of 18 thousand metric tons of chemical fertilizers for mohol taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT