सोलापूर : जिल्हाभरात भाजपाच्या वतीने मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
हेही वाचा : कोरोनाच्या तणावातून विवाहितेने घेतला गळफास
डफरीन चौकातील काळजापूर मारूती मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, संघटन सरचिटणीस बिज्जू प्रधाने, पांडुरंग दिड्डी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, आखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे सुधाकर महाराज इंगळे, वेणूगोपाल शास्त्री, अध्यक्ष सुधाकर नराल, सचिन कुलकर्णी, सुनिल गौडगांव, महेश देवकर, भिमराव कुंभार, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक किरण देशमुख, शिवानंद पाटील, नागेश वल्याळ, संतोष भोसले, नागेश भोगडे, मेनका राठोड, प्रा. नारायण बनसोडे, अंबिका पाटील, रामेश्वरी बिरू, निर्मला तांबे, परिवहनचे अध्यक्ष जय साळुंके, इंदिरा कुडक्याल, राजकुमार पाटील, रमेश यन्नम, बाबुराव घुगे, दत्तू पोसा, नागेश खरात, श्रीनिवास पुरूड, रूद्रेश बोरामणी, अनिल कंदलगी, प्रशांत फत्तेपूरकर, रामचंद्र मुटकिरी, अशोक यनगंटी, नागेश सरगम उपस्थित होते.
हेही वाचाः मुर्तीचे संकलन, विसर्जन करणार महापालिका
सांगोला येथे आंदोलन
केंद्र सरकारने देवस्थाने सुरू करण्यासाठी परिपत्रक जारी करूनही महाविकास सरकारने राज्यातील नागरिकांना कोरोनाची भीती दाखवून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. मंदिरे, देवस्थाने बंद असल्याने भाविकांना दर्शन मिळणे कठीण झाले आहे. "उद्धवा, अजब तुमचे सरकार, आता तरी मंदिराचे उघडा दार' अशी जोरदार टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी आघाडी सरकारवर केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घंटा वाजवून सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगरसेवक आनंदा माने, गजानन भाकरे, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, आनंद फाटे, एन. वाय. भोसले, अनिल कांबळे, वैजयंती देशपांडे, शीतला लादे, नागेश जोशी, मानस कमलापूरकर, अभिमन्यू पवार, देविदास कांबळे, काशिलिंग गावडे, प्रवीण जानकर, उमेश मंडले, लक्ष्मीकांत लिगाडे, संग्राम गायकवाड, ओंकार देशपांडे, संतोष खांडेकर, ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.
बार्शीत भाजपचे घंटानाद आंदोलन
बार्शी येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, अंबरिष वरदे श्री भगवंत महाराज की जय, दार उघड उध्दवा, दार उघड यासह टाळ मृदूंगाच्या आवाजात अभंग म्हणून शहर व तालुक्याचे ग्रामदैवत श्री भगवंत मंदिराच्या पायथ्याशी मंदिर उघडण्यासाठी भाजपने आज सकाळी नऊच्या दरम्यान आंदोलन केले. बार्शी शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा भाविक भक्तांसाठी सुरू करून दर्शनासाठी खुले करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपच्यावतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, रमेश पाटील उपस्थित होते.
पंढरपुरात आंदोलनाला प्रतिसाद
पंढरपूर येथे राज्यातील धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडा अशी मागणी करत आज भाजपच्या वतीने दार उघड उध्दवा दार उघड.. अशा घोषणा देत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन केले. कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून पंढरपुरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. सहा महिन्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने राज्यात अनलॉक सुरू केला आहे. यामध्ये दारू दुकानांसह दुकाने, मॉल, हॉटेल, प्रवाशी वाहतूक व माल वाहतूक सुरू केली आहे. परंतु धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडण्याबाबत सरकारने अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. मंदिरे बंद असल्याने पंढरपूर येथील व्यापारी आणि प्रासादिक विक्रेत्यांचे हाल सुरू आहेत. मंदिरावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे. यावेळी अनेक वारकरी हातात टाळ, पखवाज आणि भगवा पताका घेवून आंदोलनात सहभागी झाले होते. "दार उघड उध्दवा, दार उघड' असे म्हणत उध्दव ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, बादलसिंह ठाकूर, दत्ता राजपूत, माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर, काशिनाथ थिटे, शंतनू दंडवते, गिरीष आराध्ये उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.