Jayasiddheshwar-Mahaswamy 
सोलापूर

भाजप खासदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (ता. 21) फेटाळून लावला. त्यामुळे आता डॉ. महास्वामी यांना केव्हाही अटक केली जाऊ शकते. 


लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी जोडलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय सोलापूर जात पडताळणी समितीने दिला होता. त्यावर डॉ. महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याला न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तत्पूर्वी, जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांत कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटकेच्या भितीने डॉ. महास्वामी यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. त्यावेळी डॉ. महास्वामी यांनी सकृतदर्शनी गुन्हा केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली होती. त्यावर शुक्रवारी (ता. 20) दोन्ही बाजूची सुनावणी पार पडली होती. 


डॉ. महास्वामींना होऊ शकते केव्हाही अटक 
सोलापूर जात पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी पक्षातर्फे म्हणणे सादर करीत महास्वामींना अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी विनंती केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणीही पार पडली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद ग्राह्य धरुन महास्वामींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याची माहिती सरकारी वकिल प्रदिपसिंग रजपूत यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. त्यामुळे महास्वामींना केव्हाही अटक होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. 

आता पुन्हा डॉ. महास्वामींची उच्च न्यायालयात धाव 
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी त्यांच्यावर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालानंतर आता डॉ. महास्वामी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT