man fedding dogs.jpg 
सोलापूर

ते बनले 100 कुत्र्यांचे पालनकर्ता 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : जिथे माणसांची कदर होत नाही, तिथे प्राण्यांची कोण करतो? मात्र, या सगळ्याला कुठे ना कुठे अपवाद असतातच आणि त्यामुळेच जागरहाटी चालत असते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. असाच अपवाद ठरले आहेत, सेंट थॉमस प्रशालेतील 42 वर्षीय क्रीडा शिक्षक अमित येवलेकर. ते एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 100पेक्षा जास्त भटक्‍या कुत्र्यांचा सांभाळ करत आहेत. वाचून अचंबित झाला ना! हो, पण हे खरं आहे. बेगम पेठ परिसरात राहणारे अमित येवलेकर गेल्या 15 वर्षांपासून भटक्‍या कुत्र्यांचा सांभाळ करत आहेत. त्यांच्या घरी पूर्वीपासूनच कुत्रा, मांजर पाळीव प्राणी होते. त्यामुळे पाळीव प्राण्यांविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण होऊ लागला. रस्त्यात एखादे जखमी अथवा भुकेलेले कुत्रे दिसले तर त्याला घरी नेऊन स्वतःच्या खिशाला झळ बसवून त्या भटक्‍या कुत्र्यांवर उपचार करतात. लहान पिल्लू सापडले तर घरी आणून बोळ्याने दूध पाजून सांभाळ करतात. येथूनच पुढे त्यांना भटक्‍या कुत्र्यांना आसरा देण्याचा छंद जडला. 

जणू त्यांच्या घरातील सदस्य बनली 
राहत्या घरात एकूण सात भटकी कुत्री आहेत. ही कुत्री जणू त्यांच्या घरातील सदस्य बनली आहेत. रोज सकाळ-संध्याकाळ त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. घरातील या भटक्‍या कुत्र्यांसोबत ते रोज सकाळी बाहेर पडताना शहरात फिरणाऱ्या भटक्‍या कुत्र्यांना बिस्किटे, दूध, भाकरी यासारखे खाद्यपदार्थ देतात. त्यांच्या भटक्‍या कुत्र्यांच्या सेवेत कधीच खंड पडला नाही. असे करता करता आज शहरातील ते 100पेक्षा जास्त भटक्‍या कुत्र्यांचा सांभाळ करत आहेत. एकवेळ ते स्वत: उपाशी राहतात, पण आपल्या या मित्रांना ते उपाशी राहू देत नाहीत. 

कुत्र्यांच्या खाण्या-पिण्याचा आणि औषधांचा खर्च प्रचंड असतो. हा खर्च मला करावाच लागतो, त्यासाठी मी स्वत:च्या खर्चात कपात केली. माणसाच्या भावना आपण समजू शकतो; परंतु मुक्‍या प्राण्यांच्या भावनाही आपण समजून घेतल्या पाहिजेत. पाळीव प्राण्यांची सेवा करण्यातही वेगळा आनंद आहे. आजही कुठे जखमी कुत्रा आढळून आला तर लोक मला फोन करतात. मी तत्काळ तेथे जाऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार डॉक्‍टरांच्या मदतीने करतो. लॉकडाउनच्या परिस्थितीतही मला जमेल तसे शहरातल्या काही कुत्र्यांना जेवण पुरवितो. 

स्वखर्चातून पालनपोषण 
सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे. हॉटेल-कार्यालये बंद आहेत. संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट आहे. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांना अन्न मिळणे अवघड झाले आहे. रस्त्यांची प्रचंड उपासमार होत आहे. अशा गंभीर परिस्थितीही अमित आपल्याला वेळ मिळेल तसे सकाळ-संध्याकाळ रस्त्यावरच्या कुत्र्यांना बिस्कीट, दूध, भाकर स्वखर्चातून देत आहेत. संचारबंदीच्या काळात लोकांनी या भटक्‍या कुत्र्यांना अन्न-पाणी देण्याचे आवाहन अमित यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT