water.jpg
water.jpg 
सोलापूर

कोरोना संकटात त्यांची पाण्यासाठी भटकंती 

सकाळ वृत्तसेवा

पांडे (सोलापूर) : म्हसेवाडी तलाव पूर्णपणे आटल्याने या तलावाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या तीन गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. 

म्हसेवाडी तलावावर पांडे, म्हसेवाडी, शेलगाव या गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. या विहिरींवरच गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या शेवटी म्हसेवाडी तलाव 70 टक्के भरला होता. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोटारीने तळ्यातील पाणी उपसा केला. तरीही म्हसेवाडी तलावात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या वेळी संबंधित अधिकाऱ्याने तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची गरज होती. 

परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी बेसुमार पाणी उपसा केल्याने शेतकऱ्यांच्या मोटारींनी तलावाचा घोट घेतला. तलाव आटल्याने मासे तडफडून मेले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या तलावात आता पाणी राहिले नाही. तलाव आटल्याने पांडे येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी येणे बंद झाले आहे. गावात तीन ते चार दिवसाला दोन ते तीन घागरी भर पाणी मिळत आहे. त्यामुळे टॅंकर चालू करण्याची गरज आहे. कोरोना विषाणू संकटाबरोबर पाणीटंचाईचे संकट ग्रामस्थांवर आले आहे. टॅंकर चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

पिण्याच्या पाणीटंचाईमुळे घराबाहेर पडावे लागणार 
एकीकडे कोरोना विषाणू संकट आल्याने जीव वाचवण्याची चिंता आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाणीटंचाईमुळे घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे आजाराची भिती वाटत आहे. उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्यामुळे नवीन संकट निर्माण झाले आहे. 
- छबुबाई वीर, ग्रामस्थ 

विहीरींचे अधिग्रहण करणार 
पाणी असलेल्या तलाव परिसरातील ज्या विहीरीला पाणी उपलब्द आहे त्या विहीराला अधिग्रहण करून पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. 
- गणपत नायकुडे, ग्रामसेवक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT