Dial 112: Police Help Line for destressed Person esakal
सोलापूर

डायल ११२ करेल संकटग्रस्तांना तत्काळ मदत

ग्रामीण पोलिसांचे तगडे नियोजन; ४०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संकटात सापडलेल्या एकाकी व्यक्‍तीला आता अवघ्या काही मिनिटात मदत मिळावी, या हेतूने डायल ११२ ची यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन ग्रामीण पोलिसांनी केली आहे. ९ सप्टेंबर २०२१ पासून त्यावरून जवळपास दीड हजार व्यक्‍तींना मदत करण्यात आली आहे.(solapur rural police)

जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्‍तीला कोणत्याही वेळेत अडचण आल्यास, काही संशयास्पद वाटल्यास त्यांच्या मदतीसाठी आता डायल-११२ असणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्याची मोठी मदत होऊ लागली आहे. अपघातानंतर तेथील जखमींना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठीही हा क्रमांक उपयोगी ठरु लागला आहे. ९ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील ७०० नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिलांना डायल-११२ चा मोठा आधार मिळाला आहे. ही यंत्रणा सक्षमपणे काम करीत असून ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आठ संगणकावर दोन शिफ्टमध्ये १२ पोलिस अंमलदार काम करीत आहेत. त्यांनाही गुणात्मक व दर्जात्मक प्रशिक्षण दिले गेले आहे.(Dial 112: Police Help Line for destressed Person)

आपत्कालीन प्रसंगात मदतीच्या मागणीचा कॉल आल्यानंतर तो कॉल नियंत्रण कक्षाशी जोडला जातो. लगेचच डीसीआर येथील डिस्पॅचर तो कॉल संबंधित लोकेशननुसार संबंधित अंमलदारांपर्यंत पोहचविला जातो.(solapur rural police) ईआरव्हीवरून संबंधित पोलिस अंमलदार घटनास्थळी जातात. त्यासाठी महिंद्रा डिफेन्स प्रा.लि. आणि तंत्रज्ञ पोलिस डिस्पॅंचर हे दोघेही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते(sp tejaswi satpute), अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस उपअधिक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे काम पाहत आहेत. तांत्रिक विभागाची(technical department) जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक विष्णू कांबळे यांच्याकडे आहे.

असे आहे नियोजन...

  1. नियंत्रण कक्षातील १६ अंमलदारांना डिस्पेंचरचे प्रशिक्षण

  2. मदतीसाठी आठ संगणक संच; संबंधित पोलिसांना कळणार तत्काळ लोकेशन

  3. डायल-११२ चे २४ तास चालते कामकाज; साडेचार महिन्यांत सव्वादोन हजारजणांना मदत

  4. जिल्ह्यातील ४०० पोलिस अंमलदारांना रिस्पॉन्डचे दर्जात्मक प्रशिक्षण

  5. मदतीच्या ठिकाणी तत्काळ जाता यावे म्हणून पोलिसांना दुचाकी, चारचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT