education SSC Exam 2023 Answers written on blackboard in Wadala copy solapur
education SSC Exam 2023 Answers written on blackboard in Wadala copy solapur esakal
सोलापूर

SSC Exam 2023 : दहावीच्या परीक्षेला वडाळ्यात चक्क फळ्यावरच दिली लिहून उत्तरे!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दहावी परीक्षा केंद्रावर काल गुरुवारी ता.२ रोजी दहावी इयत्तेच्या मराठी विषयाच्या पेपरला प्रश्‍नपत्रिकेमधील प्रश्‍नांची उत्तरे चक्क फळ्यावर लिहून देण्याचा प्रकार घडला.

सामुहीक कॉपीप्रकरणात येथे शिक्षकांचीच धडपड दिसली. कॉपीमुक्ती नांदेड पॅटर्न, भरारी पथक, बैठे पथक, कॉपीसंबंधी कठोर कारवाई हे सगळे काही बासनात गुंडाळले गेले. दहावी बोर्ड परीक्षेची ऐशीतैशी दिसली.

विशेष म्हणजे या केंद्रावरील सामुहीक कॉपीचा हा सुळसुळाट पाहून वर्षभर प्रामाणिकपणे नियमीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.‘वर्षभर अभ्यास करुन आमचा उपयोग काय? कॉपीबहाद्दर पुढे जाणार’ अशा प्रतिक्रिया अश्रूंना वाट मोकळी करून देत प्रामाणिक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे पदाधिकारी असलेल्या या शाळेतील परीक्षा केंद्रावर राजरोसपणे सामुहीक कॉपीचा सिलसिला पूर्ण पेपर संपेपर्यंत सुरु होता. कॉपी प्रकारावर आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले येथील बैठे पथक कोठे गायब होत समजले नाही.

केंद्राची मान्यता काढून घेण्यापर्यंत गेले होते प्रकरण

वडाळा येथील दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र कॉपीसाठी प्रसिध्द असल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्याच्या काही भागातील मुले जादा टक्केवारीसह पास होण्यासाठी वडाळा येथे प्रवेश घेतात.

विशेषत्वे, मोठी रक्कम घेऊन त्यांना प्रवेश देत जादा टक्केवारी पडण्यासह पास करुन देण्याची हमी दिली जाते म्हणे. येथील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणाच्या तक्रारी आणि त्या संदर्भातील पाठपुरावा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे काही वर्षापूर्वी झाला होता,

तत्कालीन वेळी येथील परीक्षा केंद्रे रद्द करण्यापर्यंत कार्यवाही होत आली होती. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. केंद्राची मान्यता काढण्याइतपत सगळे होऊनदेखील या केंद्रावरील कॉप्यांचा प्रकार सुरुच आहे हे विशेष.

केडगावप्रमाणे वडाळ्यात शिक्षकांवर व्हावेत गुन्हे दाखल

केडगाव (ता. दौंड) बारावी बोर्ड परीक्षा केंद्रात सामुहिक कॉपीप्रकरणी परीक्षार्थींना उत्तेजन दिल्याबद्दल परीक्षा केंद्र चालकांसह नऊ शिक्षकांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी कारवाई कॉपी प्रकरणी एकीकडे झाली असताना वडाळा येथील कॉपीप्रकरणी शिक्षकांवरदेखील थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई व्हायला हवी.कारण या केंद्रावर चक्क शिक्षकांनी फळ्यावी उत्तरे लिहून देऊन विद्यार्थ्यांना सामुहिक कॉपीला उत्तेजन दिले आहे.

व्यस्त शिक्षणाधिकारी वठारेंना प्रतिक्रिया द्यायला नाही वेळ

वडाळा येथील सामुहिक कॉपी प्रकरणासंदर्भात काय कारवाई करणार? याबद्दल प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला अनेक वेळा कॉल लावूनदेखील त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. काही वेळाने पुन्हा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी सतत व्यस्त लागत होता. यावरुन शिक्षणाधिकारी वठारेंना प्रतिक्रिया द्यायला वेळ नाही किंवा आवश्‍यकता वाटत नाही हे सिद्ध होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT