shetkari sanghtana.jpg 
सोलापूर

ऊस उत्पादकांना पहिली उचल 2500 रुपये देण्यांची शेतकरी संघटनांची मागणी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः जिल्ह्यामध्ये साखर कारखाने ऊस उत्पादकांना पहिली उचल 2500 रुपये द्यावी अशी मागणी विविध शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी केली असून अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडेल असा इशारा दिला आहे. 

शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांची मागणी केली आहे जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे गाळप सुरू झाल्यानंतर अद्यापही एकाही साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर कोणतीही रक्कम जमा केली नाही. 

प्रत्यक्षात कायद्यानुसार शेतकऱ्याचा ऊस गाळपासाठी गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पैसे जमा नाही केली तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तरतूद आहे तसेच त्या शेतकऱ्यांना बॅंकेच्या नियमानुसार 15 टक्के व्याज दराने पैसे द्यावे लागतात मात्र प्रत्यक्षात साखर कारखानदारांनी हा कायदा पायाखाली तोडण्याचे काम चालवले आहे जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्‍यातील युटोपियन खाजगी कारखाने सतराशे रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. 
सांगली, सातारा व कोल्हापूर भागातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल 2800 ते 3000 रुपये अशी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल 2800 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे. 
या स्थितीत सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून साखर कारखानदार व शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक लावून लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे. अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्था स्थितीला आपण जबाबदार राहाल असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.या बाबतचे निवेदन आज सर्व जिल्हाधिकारी व पुलीस अधिक्षक यांना निवेदन दिले. यावेळी रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी संघटना, बळीराजा शेतकरी संघटनांचे सर्व पदाधिकारी दीपक भोसले, माऊली हळणवर, महमुद पटेल, विजय रणदिवे, सोमनाथ भोसले, माउली जवळेकर, प्रवीण नाईनवरे, माऊली गुडंगे उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT