पोलिस निरीक्षक गुंजवटे
पोलिस निरीक्षक गुंजवटे Sakal
सोलापूर

...अखेर वादग्रस्त पोलिस निरीक्षक गुंजवटे यांची बदली! 'जनहित'चे यश

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

वादग्रस्त पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांची अखेर सोलापूर येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : येथील पोलिस ठाण्याचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे (Jotiram Gunjwate) यांची अखेर सोलापूर येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वाचक शाखेचे पोलिस निरीक्षक रणजित माने (Ranjit Mane) यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला असून, ते आज बुधवारी पदभार स्वीकारणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. (Finally, controversial police inspector Gujwate was transferred)

पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असून, कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र त्यांच्या कारकिर्दीत मरवडे येथील दोन मुलींचा विषबाधेतून झालेला मृत्यू व गुन्हा (Crime) दाखल करण्यास लावलेला विलंब त्याचबरोबर शहरात पडलेले दोन दरोडे व ग्रामीण भागात दरोड्यातून झालेला खून याचा तपास लावण्यात ते अपयशी ठरल्याने ते वादग्रस्त बनले होते. पोलिसालाच वाळू वाहतूक करणाऱ्याने चिरडल्याने अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दाही चर्चेत आला असतानाच पोलिसानेच वाळूचे वाहन सोडण्यासाठी लाच घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. तर संतोष चव्हाण या पोलिसाने घेतलेली लाच वरिष्ठांच्या सूचनेने घेतल्याचे म्हटले होते. आरोपीने बोकड पार्टीस नेल्याची घटना देखील त्याच काळात घडली. एकूणात, मंगळवेढ्यातील पोलिस स्टेशनचा कारभार वादग्रस्त ठरत होता, मात्र वरिष्ठांसमोर सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले जात होते.

आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Awatade) यांनी देखील तालुक्‍यातील अवैध व्यावसायिकांना खतपाणी घातले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, हा मुद्दा पकडून जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) मागील आठवड्यापासून पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलनास (Agitation) कडाक्‍याच्या थंडीतही कार्यकर्त्यासह बसले. तत्पूर्वीच मरवडे येथील रास्ता रोको आंदोलनात थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षकांच्या समोर आरोप केल्याने पोलिस खात्याच्या प्रतिमेला तडा गेल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे मंगळवेढ्यातील पोलिस यंत्रणेकडून सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, याची जाणीव उपस्थित जमावाच्या रोषातून स्पष्ट झाली.

दरम्यान, या आंदोलनाबाबत कोल्हापूर (Kolhapur) परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया (Manoj Lohia) यांनाही माहिती देण्यात आली. ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी त्यांच्या बदलीचा नुकताच आदेश काढला असून, तो आदेश मंगळवेढा पोलिस स्टेशनला (Mangalwedha Police Station) प्राप्त झाला. त्यानंतर आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाला यश आल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी झाल्याशिवाय आम्ही आंदोलन माघारी घेणार नसल्याचे सांगितले. पोलिस खात्याच्या विरोधातील जनहितचे मंगळवेढ्यातील दुसरे आंदोलन यशस्वी ठरले.

यापूर्वी प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणातही पोलिस निरीक्षकांच्या विरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळी तपास काढून घेण्यात आला व नंतर बदलीला सामोरे जावे लागले. नव्याने येणारे पोलिस निरीक्षक रणजित माने हे वाचक शाखेकडून मंगळवेढ्यास येत आहेत. त्यांच्या जागेवर पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे (Namdev Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT