social.png 
सोलापूर

ऐका हो ऐका ! कोरोनाला हद्दपार करण्यासाठी "हे' करा 

तात्या लांडगे

सोलापूर : स्वाईन फ्लयू, निमोनिया, सर्दी, खोकला आणि कोरोना या आजारांपासून चार हात लांब राहायचे असेल तर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायलाच हवे, असा निरोगी आरोग्याचा मूलमंत्र या आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी दिला आहे. 

कोरोना या वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्यासाठी राज्यातील तब्बल सव्वालाख डॉक्‍टर्सना प्रशिक्षण देण्यात आले असून आता आयुषच्या एक लाख डॉक्‍टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अचानक या संकटाचा विळखा वाढल्यास तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध असावेत, हा त्यामागील हेतू आहे. दरम्यान, कोरोनाला हद्दपार करण्यात सर्वात मोठा वाटा नागरिकांचा असणार आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्कचा वापर करा, हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात येत आहे. लॉकडाउन करुनही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने केंद्र व राज्य सरकारकडून ठोस नियोजन सुरु आहे. दरम्यान, स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशावरील कोरोनाचे संकट घालविण्यासाठी डॉक्‍टर अहोरात्र मेहनत घेत असून त्यांना सहकार्य करण्यासाठी नागरिकांची मदत खूप मोलाची ठरणार आहे. 


तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून घ्यावा सल्ला 
सर्दी, खोकला, पडसे, निमोनिया, स्वाईन फ्ल्यू, कोरोना असे साथीचे आजार होऊ नयेत म्हणून नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, करणे, पौष्टिक आहार घेणे, काही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घेतल्यास निश्‍चितपणे प्रत्येकांचे आरोग्य निरोगी राहील. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्‍टर म्हणतात... 

  • जीव धोक्‍यात घालून आम्ही करतोय कोरोनाबाधितांवर उपचार 
  • नागरिकांनी घ्यावी खबरदारी : सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनाशी यशस्वी मुकाबला 
  • प्रशिक्षित डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने दिले पीपीई कीटचे संरक्षण 
  • डॉक्‍टरांपासून काहीच लपवू नका : रोग प्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी व्यायाम अन्‌ पौष्टिक आहार घ्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT