morcha
morcha 
सोलापूर

कोळी समाज "पेटला', हक्कासाठी सोलापुरात एकवटला 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोण म्हणतयं देत नाही....घेतल्याशिवाय रहात नाही. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे...आम्ही अनुसूचित जमातीचे नाहीत तर मग...मायबाप सरकार तुम्हीच सांगा आमची जात कोणती? हर हर महादेव, जय वाल्मीकी यासह अनेक घोषणांनी आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. पिवळ्या आणि भगव्या झेंड्यांनी सोलापुरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सोलापूर व परिसरातील जिल्ह्यांमधील महादेव कोळी समाजाचे दाखले अमान्य होत असल्याने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांवर गंडांतर येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद झाली. जातीसाठी व जातीच्या हक्कासाठी आक्रमक झालेला कोळी समाज आज रस्त्यावर उतरला होता. 
हेही वाचा - सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी देणार निष्ठावंतांना संधी 
महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 21 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय घेऊन सेवेत कायम असलेल्या अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त करून त्यांना अकरा महिन्यांची तात्पुरती नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील साठ हजार कर्मचारी व त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या निर्णयामध्ये सेवा विषयक लाभ सेवा निवृत्ती नंतरचे लाभ पदोन्नतीचा लाभ देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद केलेली नाही तातडीने शुद्धिपत्र काढून कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवून मिळणारे वेतन सेवानिवृत्ती वेतन सरळ सेवा भरती चे सर्व फायदे त्यांना द्यावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. 
हेही वाचा - तुमच्या मोबाईलमध्ये हे धोकादायक ऍप्स्‌ आहेत का? 
सोलापूर बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हर हर महादेव आणि जय वाल्मीकी असा असलेल्या भगव्या टोप्या मोर्चेकऱ्यांनी घातल्या होत्या. पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या झेंड्यांचा मोर्चामध्ये समावेश होता. या मोर्चाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या प्रसंगी प्रा. अशोक निंबर्गी, अरुण लोणारी, संजयकुमार कोळी, सुधाकर सुसलादी, अंबादास कोळी, नागेश बिराजदार, सिद्धार्थ कोळी, गणेश कोळी, विश्वनाथ कोळी, रवी यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : खलील अहमदने दिला मुंबईला पहिला झटका; सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

T20 WC 24 India Squad : अजित आगरकर पोहचला दिल्लीत; लवकरच निश्चित होणार भारताचा वर्ल्डकप संघ?

SCROLL FOR NEXT