Cotton Crop esakal
सोलापूर

Latur : शेतकऱ्यांचा कापूस येताच भाव गडगडले

वेचणीस दहा रुपये प्रतिकिलो; मागील वर्षी मिळाला उच्चांकी दर

सकाळ डिजिटल टीम

माजलगाव : मागील वर्षी उच्चांकी १२ ते १३ हजार रूपये प्रतिक्विंटल पर्यंत गेलेल्या कापसाचे दर शेतकऱ्यांकडे कापूस येताच पडले आहेत. तर, दुसरीकडे वेचणीस मात्र दहा रूपये प्रतिकिलो पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत.

मागील वर्षी कापसाला उच्चांकी दर मिळाला होता. यामुळे यावर्षीही खरीप हंगामात तालुक्यामध्ये २२ हजार ६१८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यावर्षीही मोठा भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असताना आता वेचणी करून बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरात आणला आहे.

तर, अनेक शेतकऱ्यांना असलेली आर्थिक नड दूर करण्यासाठी शेतकरी कापूस विक्री करत आहेत. परंतु, बाजारात साडेसात ते सात हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर कापसाला मिळत आहे. याउलट शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मजुर मिळत नसून, दहा रूपये प्रतिकिलोचा भाव कापूस वेचणाऱ्या मजुरास द्यावा लागत आहे.

मनकॉट, कुणाल आणि पी. एस. कॉटन या तीन जिनिंगवरून कापूस खरेदीची सुरवात करण्यात आली आहे. प्रारंभी ७,७०० रूपये दर देण्यात आला होता. परतीच्या पावसामुळे कापसाची आद्रता तपासून भाव देण्यात येत आहे. सध्या २० ते २२ टक्के आद्रता आहे. ८ ते १० टक्के आद्रता असलेल्या कपाशीला साडे सात हजार रुपयांपर्यंतचा दर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जिनिंगवरच कपाशीची विक्री करावी.

- हरिभाऊ सवणे, सचिव, बाजार समिती, माजलगाव

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपाशी गठाणीला मागणी कमी आहे. त्यामुळे दर पडले आहेत. तूर्त तरी भाव वाढण्याची शक्यता नाही.

- रामेश्वर टवाणी, संचालक, मनकॉट कापूस खरेदी केंद्र, माजलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT