माढा नगरपंचायत sakal
सोलापूर

माढा : आरक्षण सोडत प्रस्थापितांना अनुकूल ?

माढा नगरपंचायतीच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रस्थापित राजकारण्यांची सोयी झाली

सकाळ वृत्तसेवा

माढा : माढा नगरपंचायतीच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रस्थापित राजकारण्यांची सोयी झाली असून बहुतांशी प्रस्थापितांना त्यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागातील आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे. माढा नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. १२) दुपारी नगरपंचायतीच्या सहकारमहर्षी गणपतराव साठे सभागृहात काढण्यात आली. प्रस्थापित राजकारण्यांना आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे.

मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे यांना त्यांचे होमपीच असलेल्या प्रभाग चार सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित झाल्याने प्रभाग चारमधून निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. तर माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे यांचा प्रभाग क्रमांक नऊ हा पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिल्याने त्यांना या प्रभागातून पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे यांचे होमपीच असणारा प्रभाग क्रमांक सहा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असल्याने माजी नगरसेविका संजिवनी भांगे यांना येथून पुन्हा संधी मिळू शकणार असून प्रभाग एक सर्वसाधारण झाल्याने भांगे गटाला आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे.

प्रभाग सहामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे गट व भांगे गट अशी पारंपरिक लढतही होऊ शकते अथवा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव असलेला प्रभाग क्रमांक सात कानडे गटाला अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे. जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका अनिता चवरे यांचा प्रभाग क्रमांक अकरा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असल्याने त्यांना तेथे पुन्हा संधी मिळू शकते. माजी नगरसेवक शहाजी साठे यांनाही आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे. माजी महिला व बालकल्याण सभापती कल्पना जगदाळे यांच्या गटाला व गटनेते सुभाष जाधव यांना मात्र सुरक्षित प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

आदिती श्रीकांत शहाणे या विद्यार्थिनीने आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढल्या. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, नायब तहसीलदार रविकिरण कदम, मुख्याधिकारी डॉ. चरण कोल्हे, नगर अभियंता गणेश बागल, विपुल पुजारी, पाडुरंग जोशी यांच्यासह संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माजी नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, माजी नगरसेवक शहाजी साठे आदी उपस्थित होते.

माढा नगरपंचायतीचे आरक्षण

सर्वसाधारण : प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, दहा. सर्वसाधारण स्त्री : प्रभाग क्रमांक सहा, आठ, अकरा, तेरा, पंधरा. अनुसूचित जाती : प्रभाग क्रमांक दोन, सोळा. अनुसूचित जाती स्त्री : प्रभाग क्रमांक बारा व सतरा. नागरिकांचा मागास प्रवर्ग : प्रभाग क्रमांक नऊ, चौदा. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : प्रभाग क्रमांक पाच व सात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT