vijaykumar deshmukh esakal
सोलापूर

महाविकास आघाडीकडे स्वत:चे उमेदवार नाहीत! आमदार देशमुखांची टीका

महापालिकेवर भाजची पुन्हा एकहाती सत्ता यावी, याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार विजयकुमार देशमुख व शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यावर सोपविली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेवर भाजची पुन्हा एकहाती सत्ता यावी, याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार विजयकुमार देशमुख व शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यावर सोपविली आहे. त्यानंतर आमदार देशमुखांनी प्रदेशाध्यक्षांचे आभार मानले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार देशमुख यांच्याकडे महापालिका निवडणुकीचे प्रभारीपद दिले असून निवडणूक प्रमुख म्हणून शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. दरम्यान, सोलापूर शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्‍न भाजपने सोडविले असून कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढी आम्ही केली, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असेही आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले. दरम्यान, महापालिका निवडणुकीची धुरा आमदार विजयकुमार देशमुख व त्यांचे कट्टर समर्थक शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविल्याने आमदार सुभाष देशमुख यांच्या गटातील नगरसेवक नाराज झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांना सोबत घेऊन महापालिकेची निवडणूक होईल, असे निवड झालेल्या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीविरुध्द ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे सत्तेतील भाजपने शहरातील नागरिकांसाठी पाच वर्षांत केलेली कामे आणि नियोजित प्रस्तावित कामे जनतेसमोर ठेवून आम्हीच पुन्हा निवडणूक जिंकू, असा विश्‍वासही आमदार देशमुख यांनी व्यक्‍त केला.

'महाविकास'कडे स्वत:चे उमेदवार नाहीत
महाविकास आघाडीतील पक्षांकडे स्वत:चे उमदेवार नाहीत. त्यामुळे भाजपमधील नाराजांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन देऊन विरोधक आमच्या पक्षातील इच्छुकांना त्यांच्या पक्षात घेतले जात आहे. परंतु, आमच्या पक्षातील कोणीही इतर पक्षात जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. उमदेवारी दिलेल्या सर्वांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण काम करु, असेही आमदार विजयकुमार देशमुख यावेळी म्हणाले.

उमेदवारी देण्याचा निकष काय?
2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यात राष्ट्रवादीला चार तर कॉंग्रेसला 14 जागांवर विजय मिळाला. तर शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आणि 22 नगरसेवक विजयी झाले. तर भाजपला कधी नव्हे ते यश मिळाले आणि 49 नगरसेवक असलेला भाजप सत्ताधारी बनला. आता मागील निवडणुकीत पराभूत आणि विजयी उमेदवारांनी पुन्हा एकदा उमेदवारीची मागणी केली आहे. तर नव्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी हवी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपकडून काय निकष लावला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेणेकरून नाराज इतर पक्षात जाणार नाहीत, यादृष्टीने ते निकष महत्त्वाचे ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT