सोलापूर

सोलापूरकर असुरक्षित! साडेबारा लाख लोकसंख्येच्या शहरात अवघे 20 CCTV

तात्या लांडगे

संपूर्ण शहरात महापालिकेचे केवळ 20 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातीलही काही कॅमेरे सध्या बंद पडल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर: शहराच्या विस्तारानंतर सध्या शहराची लोकसंख्या अंदाजित साडेबारा लाखांपर्यंत वाढली. नागरिकांची सुरक्षितता व त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा देण्याची प्रमुख जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र, धक्‍कादायक बाब म्हणजे संपूर्ण शहरात महापालिकेचे केवळ 20 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातीलही काही कॅमेरे सध्या बंद पडल्याचे सांगण्यात आले.

अक्‍कलकोट रोड, जुळे सोलापूर, बाळे, केगाव, तुळजापूर रोड (शेळगी), जुना, नवीन विडी घरकूल, अवंती नगर, देगाव रोड असा शहराचा विस्तार वाढलेला आहे. शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले असून, मागील काही दिवसांपासून शहरात चोरी, घरफोडी, अवैध व्यवसाय सुरु असल्याचे चित्र आहेत. पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेल्या चोरट्यांचा तथा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत होते. साडेबारा लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरातील महत्त्वाचे चौक वगळता अन्यत्र कुठेही महापालिकेने कॅमेरे बसविलेले नाहीत.

दुसरीकडे मात्र, महापालिका परिसर व कार्यालयाच्या परिसरात तब्बल 291 कॅमेरे लावले आहेत. आता त्याच ठिकाणी पूर्वीचे जुने कॅमेरे काढून नवीन कॅमेरे बसविले जाणार आहेत, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, एमआयडीसी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी 70 फूट रोडवरील महापालिकेच्या कॅमेऱ्याचे फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कॅमेरा कित्येक वर्षांपासून बंद पडल्याचा अनुभव पोलिसांना आला. अनावश्‍यक कामांवर कोट्यवधींचा खर्च करणारे प्रशासन व रस्ते अन्‌ ड्रेनेजच्या कामांवर जोर देणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नावर किती गंभीर आहेत, हे त्यावेळी स्पष्ट झाले.

"सीसीटीव्ही'ची सद्यस्थिती

- भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक- 4

- छत्रपती संभाजीराजे चौक- 8

- छत्रपती शिवाजी महाराज चौक- 8

- महापालिका कार्यालय व परिसर- 291

शहरातील कुठे-कुठे महापालिकेचे सीसीटीव्ही आहेत, चालू स्थितीत किती आहेत, याची माहिती काढली आहे. 2014 मध्ये महापालिकेत बसविलेले कॅमेरे बदलण्याचे नियोजन आहे.

- श्रीराम पवार, सहायक आयुक्‍त, सोलापूर महापालिका

देखभाल-दुरुस्तीसाठीही आता ठेकेदार

काही वर्षांपूर्वी नवीन रस्ता तयार करणे असो वा रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, अशी कामे महापालिकेच्या माध्यमातून केली जात होती. कालांतराने ठेकेदारी पध्दत रुढ झाली आणि छोट्या-मोठ्या कामांसाठी ठेकेदार नियुक्‍त केला जाऊ लागला. दरम्यान, महापालिकेने छत्रपती संभाजीराजे चौक (जुना पुना नाका), छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दुसरीकडे महापालिकेत 291 कॅमेरे आहेत. सध्या त्याची देखभाल-दुरुस्ती महापालिकेच्या संगणक विभागाकडून केली जात आहे. मात्र, आता कॅमेऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मक्‍तेदार नियुक्‍त केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT