The number of bogus voters has increased by about 40 percent in the last five years
The number of bogus voters has increased by about 40 percent in the last five years 
सोलापूर

मोहोळ नगरपरिषदेच्या यादीत शेकडो बोगस मतदार

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरातील मतदार यादीत गेल्या पाच वर्षापासून बोगस मतदारांची सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. याची रीतसर चौकशी करून या प्रक्रियेत सहभाग असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, बोगस नावे कमी करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अन्यथा येत्या मंगळवारी तहसील कार्यालयावर जन मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली. दरम्यान मतदार यादीत सोलापूर, पंढरपूर, तुंगत, आदीसह ३० गावातील मतदारांची नावे आहेत, यामुळे खळबळ उडाली आहे.

Fastag Update : फास्टॅग नसल्याने वरवडे टोलनाक्यावर दोन हजार वाहनांकडून दुप्पट टोल वसूल
 
रमेश बारसकर म्हणाले, की मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अनेक दिग्गजांचे तथा प्रस्थापितांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. मोहोळ नगर परिषदेच्या 2016 च्या पहिल्या निवडणुकीत 17 हजार 386 मतदार होते. विधानसभेच्या निवडणुकीत 2019 ला 5 हजार 255 इतके मतदार वाढले. एकूण 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र भाग क्रमांक 90, 91, 95, 107, 99, 100, 113, 102, 93, 98 या क्रमांकावर 40 टक्के मतदार वाढले आहेत. भाग क्रमांक 111, 88, 105, 106, 90, 94, 97, 101, 103, 104, 108 ,89, 112, 92 व 96 या १५ भागांमध्ये केवळ 706 मतदारांचीच वाढ झाली आहे.

प्रभाग क्रमांक 2, 3 ,5 ,6, 7, 8, 9, 12, 14, 16, 17 अशा ११ प्रभागांमध्ये सर्वात जास्त बोगस मतदार नोंदविले गेले आहेत. विशेष म्हणजे हे प्रभाग दिग्गज नेत्यांचे आहेत. या संपूर्ण प्रकारात यंत्रणा प्रमुखांचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप बारसकर यांनी केला. हे बोगस मतदार व या प्रक्रियेतील अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशीही मागणी बारसकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीत अडचण आल्याने पुढे काय होणार याकडे मोहोळवासियांचे लक्ष लागले आहे. 

या गावातील मतदारांचा यादीत समावेश 

मतदार यादीत पंढरपूर, सोलापूर, पाडळी ,कुरूल, हिंगणी, भोसरी, तुंगत, भांबेवाडी, कोळेगाव, ढोक बाभुळगाव, आंबेचिंचोली, अकोलेकाटी, देवडे, पोखरापूर, नारायण चिंचोली ,उपळाई, फुलचिंचोली, कासेगांव, औंज, अक्कलकोट ,औंढी, कोथाळे, अंजनगाव उमाटे, कौठाळी, सरकोली, केवड, गावडी दारफळ, पुळुज, कुर्डूवाडी, देवडी या गावातील मतदारांची नावे आहेत. या बोगस मतदारांबाबत राज्य निवडणूक आयोग व विभागीय आयुक्त यांना आपण भेटणार असल्याचेही बारसकर यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT