अकरावी प्रवेशाचा कट ऑफ घसरला! कला शाखेला जागेवरच प्रवेश Gallery
सोलापूर

अकरावी प्रवेशाचा कट ऑफ घसरला! कला शाखेला जागेवरच प्रवेश

अकरावी प्रवेशाचा कट ऑफ घसरला! कला शाखेला जागेवरच प्रवेश

तात्या लांडगे

विद्यार्थ्यांचा यंदा व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढला असून, कला शाखेला विद्यार्थी मिळत नसल्याने अर्जदार विद्यार्थ्यांना जागेवरच प्रवेश दिला जात आहे.

सोलापूर : दहावीची परीक्षा यंदा कोरोनामुळे (Covid-19) झाली नसल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान (Science), वाणिज्य (Commerce) शाखेचा कट ऑफ यंदा वाढेल, असा अंदाज होता. परंतु, संगमेश्‍वर, दयानंद, वालचंद, ए. डी. जोशी महाविद्यालयांचा कट ऑफ गतवर्षीच्या तुलनेत कमीच राहिला. विद्यार्थ्यांचा यंदा व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढला असून, कला (Arts) शाखेला विद्यार्थी मिळत नसल्याने अर्जदार विद्यार्थ्यांना जागेवरच प्रवेश दिला जात आहे.

जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या 198 महाविद्यालयांची प्रवेक्ष क्षमता 29 हजार 237 तर वाणिज्य शाखेच्या 112 महाविद्यालयांमध्ये 11 हजार 328 जागा आहेत. दुसरीकडे, कला शाखेच्या 215 महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 36 हजार 171 आहे. जागांच्या तुलनेत विद्यार्थी कमी असल्याने सर्वांनाच प्रवेश मिळेल, असा विश्‍वास माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी व्यक्‍त केला. परंतु, विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली असून वाणिज्य शाखेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. यंदा विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे गेल्याने 100 टक्‍के प्रवेश होतील की नाही, याची चिंता महाविद्यालयांना सतावू लागली आहे. दहावीची परीक्षा न झाल्याने 60 टक्‍क्‍यांहून अधिक गुण पडलेले 80 टक्‍के विद्यार्थी असल्याने त्यांनीही कला शाखेला बगल दिली आहे. कला शाखेतून शिक्षण घेण्यापेक्षा आयटीआय अथवा पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेतलेला बरा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कला शाखेसाठी अर्ज केलेल्यांना बहुतांश महाविद्यालयांनी ऑन द स्पॉट प्रवेश द्यायला सुरवात केली आहे.

विज्ञान शाखेचा "असा' आहे कट ऑफ

  • भारती विद्यापीठ : 91.40 टक्‍के

  • दयानंद महाविद्यालय : 91 टक्‍के

  • चंडक महाविद्यालय : 89.40 टक्‍के

  • वालचंद कॉलेज : 89.20 टक्‍के

  • ए. डी. जोशी महाविद्यालय : 85 टक्‍के

  • कुचन महाविद्यालय : 85 टक्‍के

  • हिराचंद नेमचंद कॉलेज : 82.40 टक्‍के

  • संगमेश्‍वर कॉलेज : 80 टक्‍के

  • डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज : 78.80 टक्‍के

3 सप्टेंबरला दुसरी गुणवत्ता यादी

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्याचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून, आता प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी 3 सप्टेंबरला दुसरी तर 9 सप्टेंबरला तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरही ज्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना गुणवत्तेनुसार जागेवरच ऑन द स्पॉट प्रवेश दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: ३१ तासांच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचा समारोप, ढोल-ताशांच्या गजरात पुणेकर मंत्रमुग्ध

Ganpati Visarjan 2025 Live Updates : विट्याच्या राजा गणेशमूर्तीला भक्तीभावाने निरोप

Latest Maharashtra News Live Updates: तामिळनाडूत मुसळधार पाऊस! विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली, नागरिकांचे हाल

Valley of Flowers Maharashtra: महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहायचंय? मग भेट द्या साताऱ्याजवळील या निसर्गरम्य ठिकाणी!

Chapati Reheating : चपाती पुन्हा गरम करून खावू नये..पण का? डॉक्टर काय सांगतात पाहा..

SCROLL FOR NEXT