कोरोनामुक्त
कोरोनामुक्त esakal
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात अवघे ५ रुग्ण: दहा तालुके कोरोनामुक्त

तात्या लांडगे

सोलापूर : दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, बार्शी, पंढरपूर या तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व सोलापूर शहराबरोबरच ग्रामीणचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक होता. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून जिल्ह्यातील माढा वगळता सर्वच तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. आता शहरात तीन तर ग्रामीणमध्ये दोन रुग्ण शिल्लक आहेत.

जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार १४३ पुरुषांना तर ८८ हजार ५६६ महिलांना कोरोनाची बाधा झाली. संपूर्ण जिल्ह्यातील एक लाख ८६ हजार ४४ तर शहरातील ३३ हजार ६६५ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. त्यातील पाच हजार २३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील ३२ हजार १५७ तर ग्रामीणमधील एक लाख ८२ हजार ३१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता शहरातील २६ पैकी २५ प्रभागातून कोरोना हद्दपार झाला आहे. मागील काही दिवसांतील रुग्णांची स्थिती पाहता संपूर्ण जिल्हा काही दिवसांत कोरोनामुक्त होऊ शकतो. मंगळवारी (ता. ५) शहर-ग्रामीणमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दिलासादायक बाब म्हणजे अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, दक्षीण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील तीन महिला तर ग्रामीणमधील दोन पुरुष सध्या बाधित आहेत. राज्य सरकारने कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध उठवले आहेत, तरीही १२ वर्षांवरील सर्वांनी प्रतिबंधित लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेत कोरोनाची तीव्रता जाणवली नाही.

कोरोनाची सद्यस्थिती...
ग्रामीण
एकूण बाधित
१,८६,०४४
मृत्यू
३,७२६
कोरोनामुक्त रुग्ण
१,८२,३१६
सक्रिय रुग्ण

शहर
एकूण बाधित
३३,६६५
मृत्यू
१,५०५
कोरोनामुक्त रुग्ण
३२,१५७
सक्रिय रुग्ण

नोव्हेंबरपर्यंत कोरोनामुक्त गावांची पाहणी
ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याप्रमाणे दुसऱ्या लाटेत कोरोनाला गावच्या वेशीवर रोखलेल्या व गावातील कोरोना वाढणार नाही, याची खबरदारी घेणाऱ्या गावांना विभागीय स्तरावर ५० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांकडून त्या गावाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या गावाची निवड केली जाणार आहे. नोव्हेंबरपर्यंत ही पाहणी करून निवड होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT