0vitthal1.jpg 
सोलापूर

कृपा पांडूरंगाची ! सोलापूर कोरोनापासून दूरच 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा विषाणूने पुणे, सांगली, नगर, सातारा या चारही जिल्ह्यांमध्ये विळखा घालायला सुरवात केली आहे. दुसरीकडे मात्र, या जिल्ह्यांच्या सीमेवरील सोलापूर पंढरीच्या पांडूरंगाच्या कृपेने अद्याप कोरोना या विषाणूपासून दूरच आहे. महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासनाचे ठोस नियोजन आणि पांडूरंगाच्या कृपेमुळे हे शक्‍य झाल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 


पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पोलिस प्रशासनाला सक्‍त सूचना देत जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या. परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करुनच काहींना प्रवेश देण्यात आला. तर तहसिलदार, ग्रामसेवक, तलाठी, सरपंचांच्या माध्यमातून परजिल्ह्यातून गावोगावी आलेल्यांना 14 दिवस घरातच थांबावे, असे ठोस नियोजनही केले. महापालिका क्षेत्रातही तशाच उपाययोजना करण्यात आल्या. होम कोरन्टाईचा हातावर शिक्‍का असतानाही त्या व्यक्‍ती बाहेर फिरत असल्याने त्यांच्यावर पोलिसांमार्फत वॉच ठेवला जात आहे. दुसरीकडे सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाईही केली जात आहे. आता परजिल्ह्यातून येणाऱ्यांना अजिबात जिल्ह्यात प्रवेश दिला जात नसून गावोगावी समित्या स्थापन करुन नागरिकांवर नजर ठेवली जात आहे. 


जिल्ह्याच्या सीमा केल्या पूर्णपणे बंद 
परजिल्ह्यातून आलेले 14 दिवस घरातच थांबतील असे नियोजन केले असून गावोगावी गर्दी होणार नाही, याचीही नियमित दक्षता घेतली जात आहे. महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगली साथ त्यासाठी लाभली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून पांडूरंगाच्या कृपेने सोलापूर जिल्हा कोरोना या विषाणूपासून दूर राहिला आहे. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर 


जिल्हाधिकारी म्हणाले... 

  • होम कोरन्टाईलचा शिक्‍का असलेल्यांवर ग्रामस्थ अन्‌ पोलिसांमार्फत वॉच 
  • 12 देशापैकी कोणत्याही देशातून प्रवास करुन आलेल्यांवर विशेष लक्ष 
  • तालुक्‍यातील खासगी दवाखाने सुरु राहतील, यासाठी तहसिलदारांच्या माध्यमातून नियोजन 
  • इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांसमवेत चर्चा : शहरातील खासगी दवाखाने झाले सुरु 
  • सोडिअम हायपोक्‍लोराईडचा पुरेसा साठा : गरज भासल्यास गावोगावी फवारणीची व्यवस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT