Kids
Kids Canva
सोलापूर

तिसऱ्या लाटेची शक्‍यता ! गरोदर माता व बालकांची घ्या कोरोनापासून "अशी' काळजी

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Third wave of Corona) शक्‍यता वर्तविली जात असतानाच, त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना (Children at risk) असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर गर्भवती व प्रसूत मातांनी त्यांच्या नवजात शिशूची व स्वत:ची काळजी घेणे (Pregnant and lactating mothers should take care of their newborn baby) गरजेचे आहे. तर घरातील लहान मुलांच्या आहाराकडे व त्यांचा व्यायाम, झोप, छंदाकडेही लक्ष द्यावे. लहान मुले कोरोनाचे वाहक असू शकतात. त्यामुळे त्यांना घरातील ज्येष्ठांसह अन्य व्यक्‍तींपासून विलगीकरणातच ठेवावे, असे मत बालरोग तज्ज्ञांनी (Pediatrician) व्यक्‍त केले आहे.

कोरोना काळात सर्व बालकांचे पालक घरीच आहेत. मुलांच्या पालनपोषणाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे पुरेसा वेळ असल्याने कुपोषित बालकांचे वजनही वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. फास्ट व जंक फूडची दुकाने बंद असल्याने बालकांचे पोटासह अन्य आजारांचे प्रमाणही घटल्याचे सांगितले जात आहे. परंतु, मैदानी खेळ बंद झाल्याने बालक टिव्ही व मोबाईलच्या आहारी जात असल्याचे बालरोग तज्ज्ञ सांगत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे पालकांनी आवर्जून लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली आहे. बालके घरात इनडोअर खेळ, बुद्धिबळ, कॅरम, सापसिडी, दोरीवरील उड्या मारणे, सूर्यनमस्कार असे खेळ खेळू शकतात. झोपण्यापूर्वी एक तास अगोदर त्यांना टिव्ही अथवा मोबाईलच्या स्क्रीनपासून दूर ठेवावे, असा सल्लाही बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.

आहाराबद्दल अशी घ्या काळजी

  • पोटाचे आजार टाळण्यासाठी फास्ट व जंक फूड घेऊ नये

  • प्रथिनेयुक्‍त उसळी- डाळीचा वापर आहारात असावा

  • कच्चे टोमॅटो, काकडी, अंडी, मांस- मटण प्रमाणात द्यावे

  • सीझननिहाय फळे चावून खावीत, ज्यूस करून घ्यायला नको

  • मातांनी मुलांसाठी कशी घ्यावी काळजी?

  • गर्भवती मातांनी गरोदरपणात विलगीकरणात राहावे

  • प्रसूतीनंतर बाळ पॉझिटिव्ह असेल आणि स्तनपान केल्यास आईला कोरोना होत नाही

  • कोरोना पॉझिटिव्ह आईने मास्क व हाताची स्वच्छता ठेवून बाळाला करावे स्तनपान

  • घरातील बालके कोरोना स्प्रेडर ठरू शकतात; बालकांना विलगीकरणातच ठेवावे

  • बालकांना छंदात गुंतवून ठेवावे, बालकांना पकडू नये अन्‌ मुका घेऊ नये

  • बालकांना इनडोअर खेळू द्यावेत, मुलांची सहा ते आठ तास झोप असावी

नियमांचे पालन व आहारातून राहा कोरोनापासून दूर

गर्भवती महिला, नवजात शिशू, प्रसूत माता, 15 वर्षांपर्यंतच्या मुलांची काळजी घेताना प्रथिनेयुक्‍त आहार, झोप, व्यायाम याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. सिझनेबल फळे, हिरव्या, कच्च्या भाज्यांसह उसळी, डाळींचा आहारात समावेश असावा.

- डॉ. वैशाली शिरशेट्टी, बालरोग तज्ज्ञ, अध्यक्ष, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT