railway 
सोलापूर

मोठी बातमी ! 14 एप्रिलपर्यंत रेल्वे बंदच : 26 हजार कोटींचा फटका 

तात्या लांडगे

सोलापूर : देशातून कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने रेल्वे वाहतूक 31 मार्चऐवजी आता 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे रेल्वेला दररोज अकराशे कोटींचा फटका सोसावा लागत असून 14 एप्रिलपर्यंत तब्बल 26 हजार 400 हजार कोटींचे उत्पन्न बुडणार आहे. या कालावधीत 14 लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एक हजार 110 कोटींची पदरमोड करावी लागणार आहे. 


कोरोनाचे संकट देशात पाय पसरू लागल्याने देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प ठेवण्यात आली आहे. सेंट्रल रेल्वेचे 2018-19 मध्ये एक लाख 48 हजार 528 कोटींचे भागभांडवल होते. तर सेंट्रल रेल्वेला दरवर्षी दोन लाख एक हजार 90 कोटी रुपयांचे उत्पन्न मालवाहतूक रेल्वेतून मिळते. तसेच प्रवासी वाहतुकीतून दरवर्षी सरासरी दोन लाख 840 कोटींचे उत्पन्न मिळते. रेल्वेचे उत्पन्न दरवर्षी सात ते आठ टक्‍क्‍यांनी वाढत असतानाही रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना केंद्र सरकारने नुकतीच सुरू केली आहे. तब्बल 14 लाख अधिकारी व कर्मचारी रेल्वेत काम करीत असून विस्कळित वेळापत्रकांमुळे काही मार्गांवरील प्रवाशांची संख्या घटल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगीकरणाला आणखी बळकटी मिळाल्याचेही वरिष्ठ अधिकारी सांगू लागले आहेत. एकूणच कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर बुडालेल्या उत्पन्नातून रेल्वे कसा मार्ग काढणार, याची उत्सुकता लागली आहे. 


रेल्वे बंदमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम 
कोरोना हे वैश्‍विक संकट देशातून हद्दपार करण्याच्या हेतूने संपूर्ण रेल्वे वाहतूक 10 दिवस बंद ठेवली होती. मात्र, बुधवारी (ता. 25) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार 14 एप्रिलपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह सेंट्रल रेल्वेला मोठा फटका बसणार असून ज्या प्रवाशांनी तिकिटे घेतली होती, त्यांना आता परतावा देण्याचे नियोजन सुरू आहे. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 


सेंट्रल रेल्वेचा पसारा 
(एकूण अधिकारी- कर्मचारी) 
14.09 लाख 
(मालवाहतूक गाड्यांमधून उत्पन्न) 
2 लाख 1 हजार 90 कोटी 
(प्रवासी वाहतूक उत्पन्न) 
2 लाख 840 कोटी 
(वेतनापोटी होणारा खर्च) 
1 लाख 88 हजार कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी झेप; अवघ्या एका दिवसात तब्बल ३.७८ टक्क्यांनी वाढ

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Tukaram Mundhe: त्वचा उजळवणाऱ्या क्रीम धोकादायक; FDA ने 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी, सौंदर्यप्रसाधनांचा धक्कादायक अहवाल

SCROLL FOR NEXT