Milk
Milk 
सोलापूर

"स्वाभिमानी'चे माजी खासदार शेट्टी म्हणतात, मंगळवारच्या दूध बंद आंदोलनात दूध संघांनी सहभाग घ्यावा 

मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केलेल्या मंगळवारच्या (ता. 21) एक दिवसाच्या लाक्षणिक दूध बंद आंदोलनामध्ये सहकारी दूध संघांनी भाग घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

श्री. शेट्टी यांनी शुक्रवारी फेसबुकद्वारे दुधाला प्रति लिटर पाच रुपये तातडीने अनुदान दिले जावे, यासाठी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन पुकारले असल्याचे जाहीर केले. श्री. शेट्टी "सकाळ'शी बोलताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये हस्तक्षेप केला नाही तर त्यानंतर लॉकडाउनचे सर्व संकेत मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन केले जाईल. मंगळवारच्या दूध बंद आंदोलनात दूध संघांनी आमच्या भावनेला प्रतिसाद देऊन एक दिवस दूध खरेदी करू नये, असे आवाहन आम्ही केले आहे. लॉकडाउनमुळे विवाह सोहळे, आईस्क्रीम पार्लर, स्वीट होम आदींसाठी होणारा दुधाचा वापर कमी झाल्याने अनेक संस्था 18 ते 20 रुपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. परिणामी गेली काही महिने उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. 

केंद्र सरकारने 23 जून रोजी दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शासन निर्णय रद्द करावा. दूध पावडरचा 30 हजार टन बफर स्टॉक करून पावडरला प्रतिकिलो 30 रुपये निर्यात सबसिडी द्यावी. दूध पावडरवरील पाच टक्के, तूप, आम्रखंड आदी उत्पादनांवरील 12 टक्के जीएसटी ताबडतोब रद्द करावी. राज्य सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये जमा करावेत. सध्या दररोज एक कोटी 19 लाख लिटर दूध उत्पादन होते. पुढील तीन महिने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान दिले तर शासनाचे 534 कोटी खर्च होतील. परंतु त्यामुळे अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी अशा राज्यातील 46 लाख कुटुंबांना आधार मिळणार आहे. लॉकडाउनमुळे याच कष्टकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या 28 ते 30 रुपये प्रतिलिटर दूध उत्पादनासाठी खर्च येत असताना 18 ते 20 रुपये दर दिला जात आहे. परिणामी उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. या मागण्यांकडे एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

Slovakia Prime Minister : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या; जखमी अवस्थेत रुग्णालयात केलं दाखल

Pune News : धोकादायक होर्डिंग सात दिवसात काढून टाका; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

Neeraj Chopra: मायदेशातील स्पर्धेतही नीरजचा डंका! तीन वर्षांनी पुनरागमन करत फेडरेशन कपमध्ये जिंकले सुवर्णपदक

Latest Marathi News Live Update : जुने रेकॉर्ड मोडणार, चारशेपार येणार- नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT