Agitation Canva
सोलापूर

"मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार निघालं काशीला !'

मराठा आरक्षणासाठी रयत क्रांती संघटनेचे टेंभुर्णी येथे आंदोलन

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Community Reservation) समर्थनार्थ व महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) निषेधार्थ "माझे अंगण हेच रणांगण' या अनोख्या पद्धतीने "मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार निघाले काशीला' हे घोषवाक्‍य घेऊन उजनी (टें) येथे सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti S00anghatna) जिल्हाप्रमुख तथा राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी सदस्स प्रा. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन (Agitation) केले. (Rayat Kranti Sanghatana's agitation for Maratha reservation at Tembhurni)

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. याचा निषेध म्हणून मंगळवारपासून (ता. 11) आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या वेळी प्रा. पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेत राज्यात मराठा आरक्षण लागू केले. परंतु महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले म्हणून न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करीत आहोत.

प्रा. पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये, आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाजातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधा व नोकरीतील आरक्षणापासून वंचित राहिला आहे. मराठा समाजावर हा एकप्रकारे अन्याय होत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी मराठा समाजाने विना नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले. परंतु महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरले, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. हा मराठा समाजावर झालेला अन्यायच आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

या वेळी विश्वजित पाटील, ऋषिकेष पाटील, दिनेश मेटे- पाटील, यशराज पाटील, दिग्विजय फंड, मधुरा पाटील, विश्वतेज पाटील आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT