Dr. Mahendra Kadam 
सोलापूर

प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या "तणस' कादंबरीला रेंदाळकर पुरस्कार जाहीर 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट कादंबरीसाठी दिला जाणारा कविवर्य रेंदाळकर पुरस्कार येथील कादंबरीकार प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या "तणस' कादंबरीला जाहीर झाला आहे. वाचनालयाचे अध्यक्ष आर. एम. पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली. 

टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांची "धूळपावलं' आणि "आगळ' या कादंबऱ्यांनंतर "तणस' ही त्यांची तिसरी कादंबरी प्रकाशित झाली आहे. आजच्या संभ्रमित पिढीच्या वर्तमानकाळाला कवेत घेणारी ही कादंबरी म्हणजे अपेक्षाभंगाची भळभळती जखम घेऊन वावरणाऱ्या पिढीची कथा आहे. समाजातल्या विविध स्तरांमधील तरुण संघर्ष करताना यात पाहायला मिळतात. "तणस'च्या रूपाने "वाहनतळ' मराठी कादंबरीत पहिल्यांदाच अवतीर्ण झाला आहे. जिवंत आणि प्रत्ययकारी चित्रणातून "तणस'च्या रूपाने प्रगल्भ आणि वेगळी अनुभूती वाचकांना येते. 

कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ आणि उल्लेखनीय लेखकांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार निवड समितीसाठी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. 

प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी आणि मनोरमा पुरस्कार, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे, वर्धा येथील बाबा पद्मनजी पुरस्कार, कोल्हापूरचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पुण्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार आदी 17 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT