market yard.jpg 
सोलापूर

लॉकडाउननंतर हटवली बंधने आता शेतमालाची रोजच खरेदी कोठे? ते वाचा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः शहरातील मार्केट यार्डाचे व्यवहार लॉकडाउननंतर नियमित सुरू झाले आहेत. आतापर्यंत असलेली भुसार, भाजीपाला, फळे यांची वेळापत्रके पूर्णपणे काढण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता दररोज त्यांचा शेतमाल विक्रीसाठी आणता येणार आहे. 

कोरोना संकटामूळे मार्केट यार्ड मध्ये  माल खरेदीची वेळापत्रके लावून त्यावर बंधन घालण्यात आले होते. सोलापूर शहराचे लॉकडाउन व नंतर राज्याचे लॉकडाउन यामध्ये शिथिलता मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दररोज त्यांचा शेतमाल यार्डात आणण्याच्या दृष्टीेने नियोजन करण्यात आले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार भाजीपाला विक्री सकाळी साडेपाच ते साडेआठ या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. डाळिंब विक्री सकाळी आठ ते अकरा या कालावधीत होत आहे. कांदा खरेदी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी चार पर्यंत सुरू आहे. 

सध्या मार्केट यार्डात भुसार आवक नगण्य झाली आहे. येत्या आठवडाभरात कच्चा माल येण्यास सुरवात होणार आहे. सध्या गहू, तांदूळ व इतर भुसार वस्तुची थोडे फार व्यवहार सुरू आहेत. फळांच्या मार्केट मध्ये केवळ डाळिंबाची आवक बऱ्यापैकी सुरू झाली आहे. कांद्याची आवक नियमित सूरू आहे. लसणाची आवक कमी व भाव जास्त अशी स्थिती आहे. लसणाचे भाव 9000 हजार रुपये प्रती क्विंटल इतके वाढले आहेत. अजूनही शेतीमाल हंगामात भुसार मालाची आवक फारशी नसल्याने मार्केट यार्डातील वर्दळ कमी झाली आहे. 

परराज्यात माल पाठवण्याची व्यापाऱ्यांना अडचण 
सोलापूर मार्केट यार्डातून आंध्रप्रदेश, तमिळनाडूमध्ये पाठवलेला माल अडकतो आहे. या दोन्ही राज्यातील बाजारपेठामध्ये माल खरेदीचा कालावधी केवळ काही तासापुरता आहे. त्यामुळे त्या बाजारपेठेमध्ये वाहने पाठवल्यानंतर एक दिवस थांबुन माल विक्री करावा लागत आहे. तसेच माल वाहतूक परवानगींच्या अडचणी भरपूर आहेत. 

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची सोय 
लॉकडाउन संपल्यांतर आता शेतकऱ्यांना दररोज त्यांचा शेतमाल आणता येईल असे वेळापत्रक केले आहे. या पुर्वीची आठवड्यात खरेदीचे केलेले निश्‍चित वार आता रद्द केले आहेत. दरररोज फळ, भाजीपाला, कांदा आदी खरेदी सुरू झाली आहे. 
- केदारनाथ उंबरजे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती 

भुसार मालाची खरेदीचा हंगाम

या महिना अखेरीस मुग व उडिद पीक शेतकर्यांच्या हाती येईल. त्यासोबत हंगामाची धान्य खरेदी देखील सुरू होणार आहे. कोरोना संकटातून सावरत आता शेतीमाल खरेदी चांगल्या पध्दतीने होईल. 

- गुरूराज यादवाड, ज्येष्ठ भुसार व्यापारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT